‘आज काही शॉट्स फायर देखील होतील, घटनेआधीच प्रवक्त्या लेव्हीट यांची भविष्यवाणी चर्चेत!
GH News April 26, 2026 08:11 PM

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये आयोजित प्रतिष्ठीत White House Correspondents’ Dinner मध्ये अचानक झालेल्या फायरिंगमुळे अफरातफरी माजली. यावेळी या कार्यक्रमाला हजर असलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या सह अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सतर्क झाल्या. आणि या मंडळींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या संपू्र्ण घटनाक्रमा दरम्यान एक महत्वाची बाब समोर आली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हीट ( Karoline Leavitt ) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो कार्यक्रम सुरु होण्याच्या काही वेळ आधीचा आहे. या व्हिडीओ लेव्हीट म्हणतात की आज रात्री ‘गोळीबार’ होईल.

“आज काही शॉट्स फायर होतील”

कॅरोलिन लेव्हीट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाला मजेदार आणि मनोरंजक असे सांगताना म्हटले होते की आज काही शॉट्स फायर होतील. त्यांचे हे वक्तव्य राजकीय टीपण्णी म्हणून घेतले गेले. मात्र, जेव्हा खरोखरचे शॉट्स फायर झाले म्हणजे गोळीबार झाला तेव्हा हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘आजची रात्र पाहाण्यासारखी असेल ’

वास्तविक कॅरोलिन लेव्हीट व्हाईट कॉरेस्पॉडेट्स डिनरच्या बाबतीत बोलत होत्या. त्यांना या दरम्यान विचारले गेले की आज रात्रीचा माहोल कसा असणार आहे. त्यावर उत्तर देताना त्यांनी आजची रात्र पाहण्यासारखी असेल. आज रात्री ट्रम्प यांच्या संबोधनात त्यांचा खास अंदाज दिसेल. कार्यक्रमामध्ये ट्रम्प आपल्या वक्तव्याने माहोल गर्मजोशी भरतील आणि शॉट्स फायर करतील. यासाठी सर्वांना यास पाहायला हवे. हे खूपच शानदार असेल. मी ट्रम्प यांना ऐकण्यास उत्सुक आहे.त्यांनी गोळीबार हा शब्द न वापरता शॉट्स फार्यर्ड शब्दाचा वापर केला होता.

व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल

कॅरोलिन लेव्हीट यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक प्रश्न करत आहेत की अखेर व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना हल्ल्याच्या आधी गोळीबारासंदर्भात कसे कळले. लोक वेग-वेगळ्या प्रकारचे कमेंट करीत आहेत.

हिल्टन हॉटलमध्ये फायरिंगने खळबळ –

हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या फायरिंगमुळे हॉलमध्ये सुमारे २,६०० हून जास्त लोक उपस्थित होते. फायरिंगनंतर हॉलमध्ये गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक लोक गेट डाऊन असे ओरडत टेबलाच्या खाली लपले. तर हॉटेलचा स्टाफ देखील सुरक्षित स्थळांकडे पळाले. अमेरिकन सीक्रेट सर्व्हीसने लागलीच ताबा घेत संपूर्ण परिसराला छावणीच बदलून संशयिताला ताब्यात घेतले.

ट्रम्प काय म्हणाले ?

या घटनेनंतर, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितले की हल्लेखोराला पकडण्यात आले असून सर्वजण सुरक्षित आहेत. ते म्हणाले, “वॉशिंग्टन, डीसी मध्ये ही एक शानदार संध्याकाळ होती. सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी उत्तम काम केले. त्यांनी वेगाने आणि धैर्याने कारवाई केली. हल्लेखोराला पकडण्यात आले आहे आणि मी शिफारस केली आहे की कार्यक्रम सुरू ठेवण्यात यावा. परंतु आम्ही तपास यंत्रणांच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करू. ते लवकरच निर्णय घेतील.”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.