केजरीवालांचा तो एकमेव निष्ठावंत खासदार! जेव्हा राघव चड्ढांनी गोड बोलत पडद्यामागून भाजप प्रेमाचं जाळ विणलं असताना अजिबात अडकला नाही! म्हणाले, 'मला त्या आझाद ग्रुपची ऑफर आली होती, पण..'
जयदीप मेढे April 26, 2026 08:13 PM

Raghav Chadha Joins BJP: पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी आम आदमी पार्टीमध्ये (आप) मोठे बंड झाले आहे. पंजाबमधील पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा आणि इतर सहा जणांनी 'आप' सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे पंजाबमधील सहा खासदार कमी झाले आहेत. या मोठ्या बंडानंतर, पंजाबमध्ये बलबीर सिंग सिचेवाल हे एकमेव राज्यसभा सदस्य उरले आहेत. बलबीर सिंग सीचेवाल यांचा कार्यकाळ 5 जुलै 2028 रोजी संपत आहे. 'आप'च्या खासदारांच्या मोठ्या बंडानंतर, पंजाबमध्ये भाजपचे सात राज्यसभा खासदार झाले आहेत, तर 'आप'चा खासदार एक राहिला आहे. पंजाबमध्ये एकूण सात जागा आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील जनता त्यांना माफ करणार नसल्याचे म्हटलं आहे. 

'आझाद ग्रुप'मध्ये सामील होण्यासाठी ऑफर 

राज्यसभा खासदार बलबीर सिंग सीचेवाल यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना 'आझाद ग्रुप'मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. सीचेवाल यांनी असा आरोप केला की, पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेले खासदार आम आदमी पक्षाशी 'बेईमान' होते. सीचेवाल म्हणाले की, शुक्रवारी सकाळी त्यांना राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंग साहनी यांचा फोन आला होता. साहनी यांनी त्यांना सांगितले की, पंजाबचे प्रश्न मांडण्यासाठी एक नवीन 'आझाद ग्रुप' तयार केला जात आहे, ज्यावर सहा-सात राज्यसभा सदस्यांनी आधीच स्वाक्षरी केली आहे. तथापि, सीचेवाल यांनी स्पष्ट केले की, अशा कोणत्याही गटात सामील होण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही.

कोणाचा कार्यकाळ कधीपर्यंत आहे?

1. विक्रमजीत सिंह साहनी (भाजप) 05-जुलै-2022 04-जुलै-2028
2. अशोक मित्तल (भाजप) 09-एप्रिल-2022
3. राघव चढ्ढा (भाजप) 10-एप्रिल-2022 09-एप्रिल-2028
4. संदीप पाठक (भाजप) 10-एप्रिल-2022 09-एप्रिल-2028
5. हरभजन सिंग (भाजप) 10-एप्रिल-2022 09-एप्रिल-2028
6. राजिंदर गुप्ता (भाजप) 24-ऑक्टोबर-2025 09-एप्रिल-2028
7. बलबीर सिंग सीचेवाल (आप) 05-जुलै-2022 04-जुलै-2028

बलबीर सिंग सीचेवाल कोण आहेत?

2 फेब्रुवारी 1962 रोजी जन्मलेले बलबीर सिंग सीचेवाल हे एक पर्यावरणवादी आणि राजकारणी आहेत. ते एक सच्चे शीख आहेत. शीख इतिहासातील एक महत्त्वाचे स्थळ असलेल्या काली बेन नदीच्या स्वच्छता मोहिमेतील त्यांच्या भूमिकेसाठी ते विशेषतः ओळखले जातात. मार्च 2017 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते बलबीर सिंग सीचेवाल यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'टाइम' मासिकाने त्यांना पर्यावरण नायक म्हणूनही घोषित केले आहे. 64 वर्षीय बलबीर सिंग सीचेवाल हे जालंधर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. ते नदी संवर्धनाचे पुरस्कर्ते आहेत. ते सीचेवाल गावचे रहिवासी आहेत. बलबीर सिंग सीचेवाल यांचा जन्म एका शीख शेतकरी कुटुंबात झाला.

पंजाबमध्ये चार खासदार शिल्लक

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सहा राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील झाल्यानंतर, बलबीर सिंग सीचेवाल हे एकमेव राज्यसभा खासदार शिल्लक आहेत. पंजाबमधून संसदेतील 'आप'च्या सदस्यांची संख्या आता चारवर आली आहे. पंजाबमधून लोकसभेत पक्षाचे तीन सदस्य आहेत. यामध्ये राजकुमार छब्बेवाल, गुरमीत सिंग मीट आणि मालविंदर सिंग कांग यांचा समावेश आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.