Mumbai Crime News : मालवणीत वन्यजीव तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई मालवणी पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी 1.15 किलो अॅम्बरग्रीससह तरुणाला अटक केली आहे. अदनान खान, वय 24 वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यामध्ये मोठ्या तस्करी रॅकेटचा तपास सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
गस्तीदरम्यान संशयावरुन पोलिसांनी आरोपीला अडवले होते. चौकशीवेळी पोलिस शिपायावर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. आरोपीने पळताना जवळच्या खाडीत उडी मारली होती. पोलिसांनी पाठलाग करुन आरोपीला ताब्यात घेतले. भारतात अॅम्बरग्रीसची खरेदी-विक्री आणि व्यापार बंदी आहे. यामध्ये मोठ्या तस्करी रॅकेटचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.