Vidarbha News: नवतपा सुरू झाला का राजेहो?; अकोल्याचा पारा ४६.९ अंशांवर
esakal April 27, 2026 11:45 AM

उष्णतेच्या लाटेत विदर्भ पोळून निघाला असून, रविवारी अकोल्यात ४६.९ अंश एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी अधिक आहे. अमरावतीचा पारा ४६.८ अंशांवर पोहोचला असून, वर्धा येथे ४६.४, यवतमाळमध्ये ४६, चंद्रपुरात ४५ तर नागपुरात ४५.४ अंश एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, उद्यासाठी विदर्भात ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून, त्यापुढील तीन दिवस यलो अलर्ट आहे. त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंशांची घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अकोला जिल्ह्यात रविवारी (ता. २६) उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवला. सात वर्षांनंतर पुन्हा एकदा एप्रिल महिन्यात इतक्या प्रखर उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागला आहे. उन्हाच्या प्रखरतेमुळे नागरिक दुपारच्या वेळेस घराबाहेर निघण्यापासून घाबरत आहेत. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र हाेईल, असा अंदाज हवामान विभागातील तज्ज्ञांनी वर्तवला हाेता.

Vidarbha News: स्वच्छतेसाठी आतुर झाली अरुणावती नदी; २०१५ नंतर स्वच्छता झालीच नाही; प्रशासनाला कधी येणार जाग

मात्र, जिल्ह्यात मार्च महिन्यात काही प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. परिणामी वातावरणात बदल झाला हाेता. एप्रिल महिन्यात मात्र सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. प्रखर उन्हामुळे दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांत शुकशुकाट होता. रविवारी (ता. २६) उष्णतेची तीव्रता अधिक होती. तसेच उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र दिसून आले.

अकोल्यात याआधी एप्रिल २०१९ मध्ये ४७.२ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतरच्या काही वर्षांत तापमानात चढ-उतार होत राहिला; मात्र २०२६ मध्ये पुन्हा पारा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. मे महिन्याच्या अखेरीस नवतपा या नऊ-दहा दिवसांच्या काळात विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद होते. मात्र, यंदा एक महिना आधीच नवतपा सुरू झाला की काय, असे वाटत आहे.

Premium|Maharashtra Cooperative Policy : सहकार तरुण व्हावा; कडक कायदे शिथिल करून पतसंस्था, उद्योग व रोजगाराला चालना देणाऱ्या धोरणाची गरज नागपूरची होरपळ

रविवारी नागपूरकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. शनिवारी ४४.४ अंश सेल्सिअसवर असलेला पारा आज ४५.४ अंशांवर पोहोचला. हवामान विभागाने उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात पुढील तीन दिवस ‘उष्णतेची लाट’ कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. शहरातील आजचे तापमान सरासरीपेक्षा २.९ अंशाने अधिक आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.