नवी दिल्ली :के. एल. राहुलने नाबाद १५२ धावांची खेळी साकारल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्स संघाला पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत २६५ धावांचे आव्हान राखता आले नाही. शनिवारी झालेल्या लढतीत पंजाबने विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करीत दिल्लीवर देदीप्यमान विजय साकारला.
या पराभवामधून बाहेर येण्यास दिल्लीला वेळ मिळालेला नाही. सोमवारी त्यांच्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान असणार आहे. याप्रसंगी यजमान दिल्लीचा संघ गतविजेत्या बंगळूरचा झंझावात रोखणार का, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळलेल्या असणार आहेत.
RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XIदिल्लीचा फलंदाजी विभाग छान कामगिरी करीत आहे. पाथुम निस्सांकाला मोठी खेळी करता आली नसली तरी के. एल. राहुलला तो मोलाची साथ देत आहे. नितीश राणा, डेव्हिड मिलर व ट्रिस्टन स्टब्स हे खेळाडू मधल्या फळीत कात टाकत आहेत. समीर रिझवी, अक्षर पटेल यांना फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.
दिल्लीचा गोलंदाजी विभाग हा कमकुवत ठरत आहे. अकीब नबी, मुकेशकुमार टी. नटराजन या वेगवान गोलंदाजांना सपाटून मार खावा लागत आहे. अक्षर पटेल व कुलदीप यादव या अनुभवी व आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना बांधून ठेवता आलेले नाही. दोघांनाही प्रतिमेला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे.
दिल्ली संघाला गोलंदाजी विभागात कामगिरी उंचवावी लागणार आहे. दिल्ली संघाला सात सामन्यांमधून फक्त तीन सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला आहे. आयपीएल स्पर्धेचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने यापुढील प्रत्येक लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. दिल्ली संघाने याकडे कटाक्ष टाकायला हवा.
IPL 2026, DC vs PBKS: '... तर आम्ही हरायला पाहिजे', २६४ धावा करूनही पराभव झाल्यानंतर अक्षर पटेल संघावर संतापला फलंदाजांचा फॉर्म जमेची बाजूबंगळूर संघातील फलंदाजांचा फॉर्म हा त्यांची जमेची बाजू आहे. विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार यांच्याकडून शानदार फलंदाजी होत आहे. या दोघांकडून फॉर्म कायम राखण्याची अपेक्षा केली जात आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हनदिल्ली कॅपिटल्स (DC) : अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), पृथ्वी शॉ/पथुम निसंका, नितीश राणा, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, कइल जेमिसन/दुष्मंथा चमीरा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिल सॉल्ट/जेकब बेथेल (यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसिक सलाम/सुयश शर्मा.