Nagpur News: भाऊ, शहरात पाण्याचाही धर्म उरला नाही; तहानलेल्यांसाठी सोयींचा अभाव ; पाणपोई संस्कृतीच धोक्यात
esakal April 27, 2026 01:46 PM

नागपूर: तहाणलेल्यांना पाणी पाजणे हा पूर्वी धर्म समजला जात होता. उन्हाळ्याच्या कडक उन्हात वाटसरूंना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय ‘पाणपोई’द्वारे केली जात होती. मात्र, आता त्याचाही व्यवसाय झाला आहे. लोकांना धर्माचा विसर पडल्याची खंत तहानेने व्याकूळ झालेले वाटसरू ६५ वर्षीय मोतीराम बडगे यांनी व्यक्त केली.

नातेवाईक आजारी असल्याने त्यांना भेट देण्यासाठी ते नागपुरात आले होते. भेट घेऊन घरी जाण्यासाठी भर उन्हात निघाले. तहान लागल्याने रस्त्याने कुठे पाणपोई आहे काय, याचा शोध घेत होते.

Nagpur News: अनैतिक संबंधातून पत्नीकडून पतीचा मानसिक छळ; पोलिस शिपायाची आत्महत्या ; अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल

धंतोली चौकात पाणपोई दिसली, मात्र ती बंद होती. ना इलाजाने त्यांना टपरीवर पाण्याची बाटली विकत घेऊन तहान भागवावी लागली. गावात कुणालाही पाणी मागितले तर धर्म म्हणून कुणीही देतं.मात्र, शहरात कुणाला मागावे हा प्रश्न त्यांना पडला. ‘पाण्याचा धर्म’ म्हणून ओळखली जाणारी ही संस्कृती आधुनिकतेच्या लाटेत हरवत चालल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पाणपोईसाठी पुढाकाराची गरज

पूर्वी शहरातील चौक, बसस्थानके, मंदिर परिसर किंवा बाजारपेठेत स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि व्यापारी मंडळांकडून पाणपोईची व्यवस्था केली जात असे. मातीचे माठ, थंड पाणी आणि बाजूला ठेवलेले ग्लास ही साधी पण माणुसकीची जिवंत उदाहरणे होती. मात्र, आता ही जागा थंड पेयांच्या दुकानांनी घेतली आहे. तहानलेल्यांची तहान भागविण्यासाठी पाणपोई लावण्यासाठी पुढाकाराची गरज आहे.

Premium|Raja Shivaji film trolling debate : 'राजा शिवाजी' सिनेमा आणि सोशल मीडियावरील ट्रोलधाड; भीती, पीआर आणि कलाविष्काराचा संकोच पाच किमी परिसरात एकही पाणपोई नाही

शहरातील व्यस्त असलेल्या ठिकाणांपैकी रामदासपेठ, धंतोली, घाट रोड, बस स्थानक, गांधीसागर, महाल बाजार परिसर, भंडारा रोड, इतवारी बाजार परिसरात फेरफटका मारला असता मार्गावर एकाही ठिकाणी पाणपोई दिसून आली नाही. नंगा पुतळा चौक परिसरातील कापड दुकानापुढे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. मात्र, ती ही दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी असल्याचे दिसून आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.