Pune Accident: ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना, कामगार ड्रेनेजमध्ये उतरले अन् काय घडलं!
esakal April 27, 2026 12:45 PM

जेजुरी : बेलसर (ता. पुरंदर) येथील वाडा ॲग्रो मशरूम कंपनीतून येणाऱ्या सांडपाण्याच्या ड्रेनेजची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.२६) दुपारी साडेचार वाजता घडली.

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

पिंटू राजेश प्रसाद (वय २३, रा. खोराराम), व्यास सोहम कुमार (वय २२, रा. नवतम), गौतम रामसूरन कुशवाहा (वय ३६, रा. मेदनापूर, ता. रुद्रपूर, सर्वजण जि. देविरया, उत्तरप्रदेश) या तिघांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कामगार स्वच्छतेसाठी टाकीत उतरला होता. मात्र तो लवकर वर येत नाही हे पाहून दुसरा खाली उतरला. त्यानंतर ते दोघेही वर येत नाहीत म्हणून पुन्हा तिसरा कामगार टाकीत उतरला.

दरम्यान, तिघेही वर येत नसल्याचे हे पाहून शेजारील काहीजणांनी तत्काळ जेसीबीच्या साह्याने ड्रेनेजवरील स्लॅब फोडून त्यांना बाहेर काढले. या तिघांना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

हे कामगार टाकीतील साठलेल्या गॅसमुळे गुदमरून जागेवरच बेशुद्ध पडून मृत्यू झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तिघांचे शवविच्छेदन सुरू आहे. त्यांच्या मृत्यूबाबत तपास सुरू केला आहे, असे जेजुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.