पुण्यातील आयएलएस लाॅ काॅलेजमधील रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच विद्यार्थ्यांनी शिवीगाळ अन् मानसिक त्रास दिल्याचे, विद्यार्थ्यांने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार माहिती घेत, गु्न्हा नोंदवला आहे.
Chandrashekhar Bawankule : पाच वर्षांत सर्व पाणंद रस्ते बारमाही केले जाणार; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, शेतीच्या रस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी पुढील पाच वर्षांत सर्व पाणंद रस्ते बारमाही केले जातील व त्यांच्या कडेला वृक्षलागवड केली जाईल. सातबारा उताऱ्यावरील मृत व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी तहसीलदारांनी स्वतःहून ही दुरुस्ती करावी. जमिनीच्या मोजणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी खासगी मोजणीदार नेमून ड्रोनच्या साहाय्याने केवळ पंधरा दिवसांत मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
Dharashiv Update : तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीत अतिक्रमण हटाव मोहीम;1500 हून अधिक अतिक्रमणावर पालिकेचा हातोडातुळजापूर शहरातील भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीसह विविध परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. तुळजापूर शहरात नगरपालिकेच्यावतीने तीन दिवस अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शहरातील जवळपास 1500 पेक्षा अधिक अतिक्रमणे हटवण्यात आली असून, दीर्घकाळानंतर शहराने मोकळा श्वास घेतल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पालिकेच्या पथकाने JCB च्या साह्याने कारवाई करत अतिक्रमणे हटवली.
Amravati Update : अमरावती परतवाडा लैंगिक अत्याचारातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणारअमरावतीच्या परतवाडामधील लैगिंक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदसह तीन आरोपींची आज पोलिस कोठडी संपत आहे. या आरोपींना आज दुपारी पुन्हा अचलपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आतापर्यंत या आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. तर दुसरीकडे मुख्य आरोपी अयान अहमदचा पायात खोलात गेला; पुन्हा एक 16 वर्षीय युवतीने SIT समोर येत, जबाब नोंदवला आहे. आरोपी अयान याने माझ्या इच्छेविरुद्ध मला स्पर्श केल्याचे युवतीने SIT समोर जबाब दिला आहे.
Agricultural Service Center Owners Strike : खत टंचाईचा भडका; आज 85 हजार कृषी केंद्र चालकांच्या 'बंद'मुळे शेतकरी कोंडीतराज्यात एकीकडे रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत असतानाच, आता खतविक्रेत्यांनी आजपासून (ता. 27) बेमुदत बंद पुकारल्याने खळबळ उडाली आहे. खत कंपन्यांकडून होणारी लिंकिंगची सक्ती आणि प्रशासकीय जाचक अटींविरुद्ध महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइडस, सीड्स डिलर्स असोसिएशनने (माफदा) पुकारलेल्या या आंदोलनामुळे आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातील 85 हजार कृषी केंद्र चालक संपावर गेले आहेत.