Preity Zinta’s Funny Reply on Chahal Opening Goes Viral: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवले आहेत. आयपीएलच्या १९व्या पर्वात आतापर्यंत अपराजित राहिलेला, तो एकमेव संघ आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली PBKS ने २६४ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करून इतिहास घडवला. फलंदाजीच्या विभागात या संघाला रोखणे भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना जड जातेय. तेच गोलंदाजीतही या संघाची कामगिरी साजेशी होताना दिसतेय. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत विचाराल, तर श्रेयसचा मुंबई इंडियन्सविरुद्धचा झेल आठवा. पण, मालकीण प्रीति झिंटा हिच्या डोक्यात काही वेगळी योजना सुरू आहे...
पंजाबने आयपीएल २०२६ मध्ये ७ सामन्यांत ६ विजय मिळवले आहेत आणि कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे ते एकूण १३ गुणांसह तालिकेत अव्वल स्थानावरील पकड मजबूत करून उभे आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागील सामन्यात पंजाबने २६५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून इतिहास रचला होता. त्यांच्या या विक्रमी कामगिरीमुळे DC च्या लोकेश राहुलच्या १५२ व नितीश राणाच्या ९१ धावा व्यर्थ गेल्या होत्या.
IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...प्रत्युत्तरात पंजाबकडून प्रियांश आर्य ( ४३) व प्रभसिमरन सिंग ( ७६) यांनी ४२ चेंडूंत १२६ धावांची भागीदारी करून विजयाचा पाया भक्कम केला. त्यांतर श्रेयसने ३६ चेंडूंत ७१ आणि नेहाल वढेराने २५ धावांची खेळी करून संघाला १८.५ षटकांत विजय मिळवून दिला. Orange Cap च्या शर्यतीत पंजाबच्या प्रभसिमरन सिंग ( २८७), श्रेयस अय्यर ( २७९), प्रियांश ( २५४) व कॉलनी कूपर ( २४०) यांनी दबदबा राखला आहे.
IPL 2026 : आता, खरी मजा येणार! CSK ने ११० चेंडूंत २१५ धावा चोपणाऱ्या मुंबईच्या खेळाडूला बोलावलं; कोण आहे Ayush Vartak?पर्पल कॅपचा विचार केल्यास, अर्शदीप सिंग ( ७), वैशाक विजयकुमार ( ६), मार्को यान्सेन ( ५) , झेव्हियर बार्टलेट ( ५) व युझवेंद्र चहल ( ४) यांची कामगिरी ठिकठाक सुरू आहे. अशात मालकीण प्रीति झिंटाने संघातील प्रत्येक खेळाडूचे कौतुक केले आणि चाहत्यांसाठी सोशल मीडियावर प्रश्नोत्तराचा उपक्रम राबवला. पण, यात युझवेंद्रने एक प्रश्न विचारलाच आणि त्याचे त्याला गमतीशीर उत्तरही मिळाले.
प्रीति झिंटाच्या X पोस्टवर युझवेंद्रने मला एका सामन्यासाठी तरी सलामीला फलंदाजी करायला मिळेल का? असा सवाल केला. त्यावर प्रीति म्हणाली, हो नक्कीच.. तुझ्यासाठी कायपण.. आयपीएल संपू दे मग त्यानंतर तुला हवं त्या सामन्यात तू सलामीला जा.. प्रभ व प्रियांश यांची त्यावेळी काहीच हरकत नसेल.