साप दिसताच अनेकांची भंबेरी उडते, कारण सापाने दंश केला तर आपला जीव जाऊ शकतो. अनेकदा साप शेतात आढळतो, त्यामुळे तुम्हाला असे वाटले आहे का की, जर साप शेतात जमिनीवर असलेल्या एखाद्या भोपळ्याला किंवा वांग्याला चावला तर त्या भाजीमध्ये विष पसरते का? तसेच ती भाजी खाल्ल्यास माणसाच्या जीवाला धोका होऊ शकतो का? आज आम्ही तुम्हाला याबाबत विज्ञान काय सांगते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
साप चावल्याने भाजी विषारी होते का?शेतात असलेल्या एखाद्या भाजीला सापाने दंश करण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण साप निर्जीव वस्तूंवर किंवा वनस्पतींवर हल्ला करत नाहीत. मात्र चुकून जर सापाने एखाद्या भाजीला चावा घेतला आणि विष भाजीला लागले, तरी त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता खूप कमी असते. यामागे काही महत्त्वाची वैज्ञानिक कारणे आहेत.
वेनम आणि पॉइजनमधील फरकसापाचे विष हे वेनमअसते, ते पॉइजन नसते. वेनमचा परिणाम ते थेट रक्तात गेल्यास होतो. जर ते पोटात गेले आणि तोंडात किंवा पचनसंस्थेत जखम नसेल, तर पोटातील आम्ल (HCL) ते प्रथिनांप्रमाणे पचवते. त्यामुळे या विषाचा कोणताही परिणाम होत नाही.
वनस्पतींची शोषण क्षमतावनस्पती मानवी शरीराप्रमाणे विष संपूर्ण प्रणालीत पसरवत नाहीत. सापाचे विष हे जटिल प्रथिनांचे मिश्रण असते, जे वनस्पतींच्या पेशींमार्फत भाजीच्या आतील भागात सहज पसरत नाही. त्यामुळे एखाद्या भाजीवर सापाचे विष पसरले असले तरी त्याचा फार परिणाम होत नाही.
साप आणि भाज्यांबाबत महत्त्वाच्या गोष्टीदरम्यान, सापाने दंश केलेली भाजी खाल्याने मृत्यू होता असं जर तुम्हाला सांगितलं तर असत्य आहे. विज्ञानानुसार सापाच्या विषाचा फासरा परिणाम होत नाही. असं असलं तरी तुम्ही फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवावीत तसेच भाज्या धूवून नंतर त्या पूर्णपणे शिजवाव्यात आणि नंतर त्याचे सेवन करावे.