IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सने 'हुकूमी' एक्का उतरवायला हवाच! KL Rahul सोबत सलामीसाठी 'त्या' खेळाडूची चर्चा; भारतीयांच्या परिचयाचा...
esakal April 28, 2026 10:45 AM

Should Prithvi Shaw open with KL Rahul in IPL 2026? दिल्ली कॅपिटल्सला आता इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर विजयाशिवाय दुसरा पर्यायच नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्यांना ६.३ षटकांत हार पत्करावी लागली. त्यामुळे नेट रन रेटही कोसळला आहे आणि ८ सामन्यांत त्यांना फक्त ३ विजय मिळवता आले आहेत. IPL 2026 Point Table च्या गुणतालिकेत ते सातव्या क्रमांकावर आहेत. प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना उर्वरित ६ सामने जिंकणे भाग आहे. त्यामुळे आता त्यांनी हुकूमी एक्का बाहेर काढावा, अशी मागणी जोर धरतेय...

दिल्ली कॅपिटल्स: आयपीएल २०२६ सलामीची भागीदारी (पहिले ८ सामने)
  • ० धाव- लोकेश राहुल - साहिल पारख ( वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू )

  • २८ धावा - लोकेश राहुल - पथूम निसंका ( वि. पंजाब किंग्स)

  • २१ धावा - पथूम निसंका - लोकेश राहुल ( वि. सनरायझर्स हैदराबाद)

  • २ धावा - पथूम निसंका - लोकेश राहुल ( वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

  • ६१ धावा - पथूम निसंका - लोकेश राहुल ( वि. चेन्नई सुपर किंग्स)

  • ७६ धावा - पथूम निसंका - लोकेश राहुल ( वि. गुजरात टायटन्स)

  • २ धावा - पथूम निसंका - लोकेश राहुल ( वि. मुंबई इंडियन्स)

  • १ धाव - पथूम निसंका - लोकेश राहुल ( वि. लखौ सुपर जायंट्स)

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

दिल्लीने आजच्या सामन्यात साहिल पारखला पदार्पणाची संधी दिली, पंरतु १८ वर्षांचा युवा खेळाडू भुवीच्या इनस्विंग यॉर्करवर त्रिफळाचीत झाला. दिल्लीचा संघ ७५ धावांवर तंबूत परतला. अभिषेक पोरेलने संघासाठी सर्वाधिक ३० धावा केल्या. भुवीने तीन व जोश हेझलवूडने चार विकेट्स घेतल्या. RCB ने ६.३ षटकांत हे लक्ष्य पार केले आणि आयपीएल इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा ( चेंडू राखून मिळवलेला) विजय ठरला. बंगळुरूने ९ विकेट्स व ८१ चेंडू राखून ही मॅच जिंकली.

दिल्लीच्या या पराभवामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. समीर रिझवीला बेंचवर बसवून त्याच्याऐवजी आशुतोष शर्माला संधी मिळायला हवी. याचे मुख्य कारण म्हणजे केवळ 'क्षमता'असून चालत नाही, तर मैदानावरील 'प्रभाव' महत्त्वाचा असतो. आशुतोषने अत्यंत दबावाच्या परिस्थितीत सामने संपवून दाखवले आहेत. खालच्या फळीत ज्या आक्रमकतेची आणि 'एक्स-फॅक्टर'ची सध्या संघाला गरज आहे, ती आशुतोष उत्तमरीत्या भरून काढू शकतो.

अभिषेक पोरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे आवश्यक आहे. पोरेल एक असा खेळाडू आहे जो फलंदाजीला खोली आणि संघाला लवचिकता देतो. त्याचा अलीकडचा फॉर्म आणि मैदानातील निर्भय दृष्टिकोन पाहता, त्याला आता साईडलाईनवर ठेवणे चुकीचे ठरेल. पण, या सगळ्यात एक नाव खूपच चर्चेत राहिलं आणि ते म्हणजे पृ्थ्वी शॉ...

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

आयपीएल २०२४ नंतर पृथ्वी पुन्हा दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात परतला. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण, शिस्तीचा अभाव अन् फिटनेसमुळे तो वादात अडकला आहे. पण, आता पृथ्वीला मैदानावर उतरवण्याची वेळ आली आहे. तो लोकेश राहुलसह संघाला सलामीला आक्रमक सुरुवात करून देऊ शकतो. त्याच्याकडे ७९ आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे आणि त्याने १८९२ धावा केल्या आहेत. त्यामुळे पुढच्या सामन्यात साहिल पारखला संधी देण्याऐवजी पृथ्वीला संधी दिल्यास दिल्लीचा फायदा होईल, असे जाणकारांना वाटते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.