पंचांग -
मंगळवार : वैशाख शुद्ध १२, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.१० सूर्यास्त ६.५४, चंद्रोदय दुपारी ४.११ चंद्रास्त पहाटे ४.२२, भारतीय सौर वैशाख ८ शके १९४८.
दिनविशेष -
१९९८ - न्यूयॉर्क येथील ‘द अपील ऑफ कॉन्शस फाउंडेशन’तर्फे ‘स्टेट्समन पुरस्कार’ राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना प्रदान.
२००८ - श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्राच्या क्रमांक दोनच्या तळावरून ‘पीएसएलव्ही सी-९’च्या उड्डाणाद्वारे एकाच वेळी दहा उपग्रह ध्रुवीय कक्षेत सोडण्याचा विक्रम; तसेच पन्नासावा भारतीय उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची किमया भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केली.