IPL 2026 स्पर्धेत दहाही संघांना प्लेऑफची संधी, पण दोन संघांसाठी करो या मरोची स्थिती; जाणून घ्या
GH News April 28, 2026 08:11 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत 39 सामन्यांचा खेळ संपला असून गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलटफेर होताना दिसत आहे, अशा स्थितीत पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ सातत्याने टॉप 4 मध्ये जागा पकडून आहेत. तर इतर संघ टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. त्यात गुजरात टायटन्सला टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. तर चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना खूप संघर्ष करावा लागणार आहे. चला जाणून घेऊयात दहा संघांची स्थिती

  1. पंजाब किंग्स आयपीएल 2026 स्पर्धेच्या गुणतालिकेत टॉपला आहे. पंजाब किंग्सने 7 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे पंजाब किंग्सने 13 गुण आणि +1.333 नेट रनरेट आहे. आता 7 सामने शिल्लक असून दोन विजय मिळवताच प्लेऑफमध्ये जागा पक्की होणार आहे.
  2. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीने 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे 12 गुण आणि +1.919 नेट रनरेट आहे. आता उर्वरित सहा पैकी 2 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील जागा पक्की होणार आहे.
  3. सनरायझर्स हैदराबादने 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामन्यात विजय, तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. हैदराबादचा संघ 10 गुण आणि +0.815 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. उर्वरित 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवल्यास 16 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये जागा मिळेल.
  4. राजस्थान रॉयल्सची स्थिती सनरायझर्स हैदराबादसारखीच आहे. राजस्थान रॉयल्सने 8 पैकी 5 सामने जिंकले असून 10 गुण आहेत. पण नेट रनरेट राजस्थानच्या तुलनेत कमी आहे. नेट रनरेट +0.602 असून चौथ्या स्थानी आहे. आता 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला की राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफमध्ये जागा पक्की करेल.
  5. गुजरात टायटन्सकडेही टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. गुजरात टायटन्सने 8 पैकी 4 सामने जिंकले आणि 4 सामने गमावले आहेत. गुजरात टायटन्सने 8 गुण असून नेट रनरेट हा -0.475 आहे. आता 6 पैकी 4 सामने जिंकले तर प्लेऑफची संधी मिळेल.
  6. चेन्नई सुपर किंग्स आठ पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 6 गुण असून -0.121 नेट रनरेट आहे. उर्वरित सहा पैकी पाच सामने जिंकणं भाग आहे. तर आणि तरच 16 गुण होतील. त्यामुळे आणखी एक सामना गमावला तरी चालू शकतं.
  7. दिल्ली कॅपिटल्सची स्थिती चेन्नई सुपर किंग्ससारखी आहे. दिल्ली कॅपिटल्सचे 6 गुण आणि -1.060 नेट रनरेट आहे. उर्वरित 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे 16 गुणांचं गणित सुटेल आणि प्लेऑफमध्ये जागा मिळू शकते.
  8. मुंबई इंडियन्सने 7 सामने खेळले असून दोन सामन्यात विजय मिळवला. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पदरात 4 गुण असून 16 गुणांचं गणित सोडवण्यासाठी 7 पैकी 6 सामने जिंकणं भाग आहे. म्हणजेच पुढे एकही सामना गमावला तर लढाई जर तरवर येईल.
  9. लखनौ सुपर जायंट्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. लखनौने 8 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यात करो या मरोची स्थिती आहे. प्रत्येक सामना जिंकणं भाग आहे. एकही सामना गमावला तर प्लेऑफमधील जागा डळमळीत होईल. प्लेऑफमध्ये जागा मिळवणं कठीण होईल.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.