मार्कस स्टोयनिस याने अखेरच्या टप्प्यात केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्सने न्यू चंडीगडमध्ये 200 पार मजल मारली आहे. पंजाबने आयपीएल 2026 स्पर्धेच्या 40 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या.पंजाबची 2025 पासून 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही एकूण 13 वी वेळ ठरली. पंजाबसाठी ओपनर प्रभसिमरन सिंह आणि स्टोयनिस या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी शानदार बॅटिंग केली. त्यामुळे आता राजस्थान 223 धावा करत सहावा सामना जिंकणार की पंजाब विजयी घोडदौड कायम राखत आणखी 2 गुण मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.