Hair Mehendi: केसांना मेंदी लावल्याने उष्णता कमी होते?
Marathi April 29, 2026 07:25 AM




उन्हाळ्यात वारंवार जाणवणाऱ्या डोकेदुखीवर अनेकजण उपाय म्हणून केसांना मेंदी लावतात. आयुर्वेदानुसार केसांना मेंदी लावल्याने शरीरातील उष्णता कमी होत असल्याने या दिवसात बरेचजण केसांना मेंदी लावण्याचा उपाय करतात.  पण खरंच असं घडतं का? केसांना मेंदी लावल्याने डोकं दुखायचं थांबत का? आजच्या लेखात याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.

आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदानुसार मेंदी केवळ सौंदर्य वाढवत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही देते. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात हातांना आणि केसांना मेंदी लावणे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे उष्णता कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्हाला वारंवार या दिवसात डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही केसांना आणि हातांना मेंदी लावून आराम मिळवू शकता.

हेही वाचा – Diet Coke vs Coke Zero दोघांमध्ये नेमका फरक काय?

आयुर्वेदात सांगितल्यानुसार मेंदीमुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. मेंदीच्या पानांचा गुणधर्म हा थंडावा आहे. त्यामुळे जेव्हा आपण हातावर किंवा केसांवर मेंदी लावतो तेव्हा मेंदी उष्णता खेचून घेते आणि आराम मिळतो. यासह मेंदीचा लेप केसांवर संरक्षक कवच तयार करतो, ज्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण होते.

वापर कसा कराल?

उन्हाळ्यात वारंवार घाम येतो. ज्यामुळे स्काल्प खराब होतो आणि सतत खाज येते. या समस्येवर मुक्ती मिळण्यासाठी मेंदीची पाने वाटून त्यात निलगिरी आणि कापूर टाकून केसांना लावू शकता.

उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी मेंदी भिजवताना त्यात दही, लिंबाचा रस किंवा कोरा चहा मिसळावा. यामुळे थंडावा आणि रंग मिळतो.

हेही वाचा – Itchy skin: घामामुळे सतत खाज येते? करू शकता हे घरगुती उपाय



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.