Riteish Genelia fees for brand Ambassador of ST Bus: काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी एसटी बसचे ब्रँड अँबेसिडर म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जनरलिया देशमुख यांची नियुक्ती केली. बॉलीवूडसह मराठी मनोरंजन सृष्टीतील हे पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं. शिवाय राजा शिवाजी या चित्रपटातून दोघेही छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा इतिहास घेऊन समोर येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभरातून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. दुसरीकडे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांच्या मराठी अमराठी वादावरूनही रितेश बोलताना दिसला. त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा ST बसला होण्याची शक्यता लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची अँबेसिडरपदी नियुक्ती केली. पण तुम्हाला माहिती का ब्रँड अँबेसिडर होण्यासाठी रितेश आणि जेनेलियाने किती पैसे घेतले ? खुद्द परिवहन मंत्र्यांनी याविषयी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
बॉलीवूड व मराठी मनोरंजन सृष्टीतील पॉवर कपल समजल्या जाणाऱ्या रितेश आणि जेनेलिया देशमुखला महाराष्ट्राच्या लाल परीचा होण्याचा मान देण्यात आला. कुठल्याही सरकारी किंवा बिगर सरकारी ब्रँड अँबेसिडर होताना टकलाकारांना त्यांचे मानधन मिळत असतं. एसटी बसच्या जाहिराती आणि 'लाल परी'चा प्रचार करण्यासाठी रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची प्रचारक म्हणून निवड करण्यात आली.ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या मानधनाविषयी खुलासा केलाय. रितेश आणि जेनेलियाने लाल परीचा प्रचारासाठी एकही रुपया घेतला नाही, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दोघांनीही मानधन घेण्यास नकार दिल्याचं ते म्हणाले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबत अधिकृत करार करण्यात आला आहे. हा करार पाच वर्षांसाठी असणार असून, या काळात दोघेही एसटीच्या विविध जाहिराती, प्रचार मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतील. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांपर्यंत एसटीची सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय.रितेश आणि जिनिलियाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत एसटी महामंडळ नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे