Kalyan Railway Station News : कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरुन पडलेल्या एका महिलेला आणि तिच्या एक वर्षाच्या बाळाला साहाय्यक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी तातडीने धावून दोघा मायलेकांचे प्राण वाचवले आहेत. हेमंत भरगुडे यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
ठाणे दिवा येथे राहणाऱ्या अंतिमा शुक्ला या आपल्या एक वर्षाचा मुलगा सर्वज्ञ शुक्ला याच्यासह प्रयागराज येथून मुंबईला प्रवास करत असताना गाडी कल्याण स्थानकावर पोहोचली असताना, चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात अंतिमा यांचा तोल गेला आणि त्या डब्याखाली जाणार होत्या. त्याच वेळी कर्तव्यावर असलेल्या हेमंत भरगुडे यांनी देवदूतासारखे धावून येत दोघांनाही ओढून बाजूला केले. या धाडसी प्रयत्नाने माय-लेकाचे प्राण वाचले. या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, जवान हेमंत भरगुडे यांच्या या साहसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भाविकांना घेऊन जाणारे पिकअप क्लोजर वाहन पलटी झाल्यानं आठ ते दहा जण प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ गावाजवळ अपघात घडला. पिकअप क्लोजर चालकाला अंदाज न आल्याने झाला पलटी. सर्व प्रवासी बार्शी तालुक्यातील जामगाव येथील असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, अक्कलकोट उत्तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.