पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या जवळपास 12 वर्षांपासून केंद्रात भाजपप्रणित सरकार आहे. अलिकडेच 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या मतदानानंतर आज एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यात भाजपला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापन करताना पहायला मिळत आहे. यात पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीचा समावेश आहे. त्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आसाममध्ये भाजप सत्ता राखणारसमोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये आसाममध्ये भाजप पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाममध्ये एकूण 126 जागांवर निवडणूक झाली होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने चांगलीच ताकद लावली होती. भाजपाचे केंद्रातील बडे नेते या राज्यात प्रचारासाठी गेले होते. आता एक्झिट पोलनुससार भाजपाला सत्ता मिळू शकते. अॅक्सिज माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये एनडीएला 88 ते 100 जागा मिळू शकताात. तर काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यात भाजपचा झेंडा पुन्हा एकदा फडकणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये भगवा फडकणारपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आला आहे. चाणक्यच्या पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 130 – 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर पोल डायरीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अवघ्या 99 ते 127 जागंवरच समाधान मानावं लागणार आहे. तर भाजपला 142 ते 171 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या राज्यात भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
पद्दुचेरीत पुन्हा भाजप सरकारपुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचेही एक्झिट पोल समोर आले आहेत. यानुसार भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, एनडीए पुदुचेरीमध्ये 16 ते 20 जागा जिंकेल असा अंदाज आहे. डीएमके आणि काँग्रेस आघाडी 6 ते 8 जागा जिंकेल, तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.