Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकावर पुन्हा लागणार बोली; बेस प्राईज ५ लाख, BCCI ची परवानगी, LSG ने एकही मॅच नाही खेळवली
esakal April 30, 2026 04:45 AM

Arjun Tendulkar has been cleared to participate in T20 Mumbai League : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखौन सुपर जायंट्सकडून अजूनही खेळण्याची संधी न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरवर पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे. अर्जुन आणि यष्टिरक्षक-फलंदाज सिद्धांत अधतराव यांना ट्वेंटी-२० मुंबई लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. या दोघांनी नुकतंच मुंबई सोडून अन्य राज्यांकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतरही मुंबई लीगच्या चौथ्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावात त्यांचे नाव नोंदवले गेले आहे.

अर्जुन काही पर्वापूर्वी मुंबईसोडून गोवा संघाकडून खेळायला गेला होता आणि सिद्धांतने मागील पर्वात पुद्दुचेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला. नियामक आवश्यकतांची पूर्तता केल्यानंतर तो आता मुंबई लीगसाठी पात्र ठरले. मागील देशांतर्गत हंगामात पुद्दुचेरीचे प्रतिनिधित्व केल्यामुळे त्याने तेथून ना-हरकत प्रमाणपत्र मिळवले आहे.

Hardik Pandya Reaction : या पर्वात आमच्याकडे जास्त पर्यायच नाही, मी गोलंदाजांना धावत्या बसमधून...! हार्दिक हे काय म्हणाला?

पीटीआयच्या वृत्तानुसार, BCCIने अर्जुन आणि सिद्धांत या दोघांनाही ट्वेंटी-२० मुंबई लीगमध्ये सहभागी होण्यासाठी औपचारिक मंजुरी दिली आहे. गेल्या १२ महिन्यांत हे दोन्ही क्रिकेटपटू इतर कोणत्याही राज्यस्तरीय ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळलेले नाहीत, ज्यामुळे ते BCCI सहभागाच्या नियमांमध्ये बसतात. हिच एक गोष्ट त्यांना मंजुरी देण्यामागील मुख्य कारण आहे. पुरुष आणि महिला या दोन्ही गटांचा समावेश असलेल्या आगामी हंगामासाठीचा लिलाव २ मे रोजी होणार आहे.

ट्वेंटी-२० स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या राज्य संघटनांसाठी बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार,"एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त श्रम टाळण्यासाठी, प्रत्येक खेळाडूला त्यांनी भाग घेतलेल्या शेवटच्या स्पर्धेच्या समाप्तीपासून सुरू होणाऱ्या बारा महिन्यांच्या कालावधीत, इंडियन प्रीमियर लीग वगळता केवळ एकाच अधिकृत मान्यताप्राप्त क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे.”

BCCI उदाहरणार्थ, जर एखाद्या खेळाडूने राज्य संघटनेने आयोजित केलेल्या आणि ३१ ऑगस्ट २०२४ रोजी संपलेल्या ट्वेंटी२० स्पर्धेत भाग घेतला असेल, तर त्याला १ सप्टेंबर २०२५ पर्यंत इतर कोणत्याही राज्य संघटनेने आयोजित केलेल्या इतर कोणत्याही ट्वेंटी२० स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

गेल्या वर्षभरात राज्य संघटनांनी आयोजित केलेल्या कोणत्याही ट्वेंटी-२० स्पर्धांपासून दूर राहिल्यामुळे, अर्जुन व सिद्धांत हे या चौकटीत सहजपणे बसतात.अर्जुन आणि सिद्धांत या दोघांचीही मूळ किंमत प्रत्येकी ५ लाख रुपये आहे.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.