IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral
esakal April 30, 2026 05:45 AM

Vinod Kambli’s Viral Video Breaks Hearts: मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सहावा पराभव पत्करला.. घरच्या मैदानावर आयपीएल इतिहासात प्रथमच मुंबईचा संघ सलग चार सामने हरला आहे... मुंबईच्या या पराभवाचे दुःख घेऊन वानखेडे स्टेडियमबाहेर पडणाऱ्या चाहत्यांना एक भावनिक दृश्य पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेटचा एक काळ गाजवणारा विनोद कांबळी, ही मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. प्रेक्षक गॅलरीतून त्यानेही सामन्याचा आनंद लुटला, परंतु जेव्हा तो मैदानाबाहेर येत होता, तेव्हा त्याची अवस्था पाहून चाहत्यांच्या डोळ्यांत नक्की पाणी आलं असेल.

भारताचा माजी फलंदाज मागील बऱ्याच वर्षांपासून आरोग्याच्या समस्येशी झुंज देतोय... मागच्या वर्षी तर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. दारूच्या व्यसनाने त्याची प्रकृती पूर्णपणे खालावली होती. दिवंगत रमाकांत आचरेकर सरांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात जेव्हा विनोद आला होता, तेव्हा त्याने सचिन तेंडुलकरलाही ओळखले नव्हते. त्याला हात पकडून चालावे लागले होते. काही दिवसांपूर्वी विनोदची स्मृतीभ्रंश झाल्याची बातमी समोर आली होती.

त्यात विनोदच्या एका जाहीरातीने चाहत्यांना तो बरा असल्याची खात्री करून दिली. पण, त्या जाहीरातीवरून वादही सुरू आहे. अशात आज अचानक विनोद वानखेडे स्टेडियमवर दिसल्याने चाहत्यांना बरं वाटलं होतं. पण, जेव्हा तो सामना संपल्यावर स्टेडियमबाहेर पडत होता, तेव्हा त्याला दोन व्यक्तींच्या सहाऱ्याशिवाय चालता येत नव्हते. त्याची ही अवस्था पाहून चाहते हळहळले. प्रकृती साथ देत नसतानाही विनोद कांबळी वानखेडेवर आल्याने त्याचे क्रिकेटप्रेम अजूनही कायम असल्याचे जाणवले.

दरम्यान, मुंबई इंडियन्सला २४३ धावा करूनही सनरायझर्स हैदराबादकडून हार पत्करावी लागली. SRH ने १८.४ षटकांत ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबईचा हा ८ सामन्यांतला ६वा पराभव ठरल्याने त्यांचे प्ले ऑफचे गणित अवघड झाले आहे. MI ला उर्वरित ६ सामने जिंकून १६ गुणांपर्यंत पोहोचता येईल, पण प्ले ऑफसाठी त्यांना इतरांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागेल.

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.