ना ही करिना, ना ही अमृता सिंह; 'या' दिग्गज अभिनेत्रीवर जडलेलं सैफ अली खानचं पहिलं प्रेम, 60 फिल्म अन् 40 शो करुन बनलेली सुपरस्टार
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 30, 2026 09:43 AM

Saif Ali Khan First Love: सिनेसृष्टीच्या (Film Industry) झगमगत्या जगात आपलं नाव मोठं करण्यासाठी दररोज म्हटलं तरी अनेकजण येतात, काहींच्या हाती यश येतं, तर काहींची स्वप्न मात्र पूर्ण होत नाहीत. हिंदी (Hindi Movies) आणि प्रादेशिक सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री झाल्यात, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. पण, काळाच्या ओघात मात्र त्या लाईमलाईटपासून दूर गेल्या. अशीच एक अभिनेत्री म्हणजे, मुनमुन सेन (Moon Moon Sen). ऐंशीच्या दशकातील सुपरस्टार हिरोईन. जिच्या आयुष्यात सिनेमा, नाती आणि  रॉयल बॅकग्राउंडचा एक वेगळाच संगम पाहायला मिळतो. 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये काम करत त्यांनी सुमारे 60 सिनेमे आणि 40 टेलिव्हिजन मालिकांमध्ये (TV Serials) काम केलंय. एका काळात त्यांचं नाव सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यासोबत जोडलं गेलेलं, ज्यामुळे त्या अधिक चर्चेत आल्या. आजही असं सांगितलं जातं की, सैफ अली खान मुनमुन सेन यांच्यावर भाळलेला. त्याचं पहिलं प्रेम होती ही दिग्गज अभिनेत्री. 

अभिनेत्री मुनमुन सेन (Actress Moon Moon Sen) म्हणजे, दिग्गज अभिनेत्री सुचित्रा सेन (Actress Suchitra Sen) यांची मुलगी. आई 'महानायिका' असूनही मुनमुन यांनीही अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. हिंदीबरोबरच बंगाली, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांतील सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना नंदी स्टेट अवॉर्ड, कालकेंद्र स्क्रीन अवॉर्ड आणि भारत निर्माण अवॉर्ड यांसारख्या सन्मानांनी गौरविण्यात आलं आहे.

फिल्मी करिअर आणि आईकडून मिळालेला वारसा (Actress Moon Moon Sen Life Stroy)

अभिनेत्री मुनमुन सेन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं तर, त्यांच्या रॉयल बॅकग्राउंडमुळे विशेष ठरतं. त्यांच्या सासुबाई इला देवी या कूचबिहारच्या राजकन्या होत्या, तर जयपूरच्या महाराणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायत्री देवी या त्यांच्या नातेवाईक होत्या. या राजघराण्याच्या वारशामुळे मुनमुन सेन यांचं व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसतं.

मुनमुन सेन यांचं वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेचा विषय राहिलंय. 90च्या दशकात त्यांचं नाव सैफ अली खान यांच्यासोबत जोडलं गेलं होतं, ज्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या. याशिवाय निर्माते रोमू सिप्पी आणि अभिनेते विक्टर बनर्जी यांच्यासोबतही त्यांच्या नावाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, मुनमुन सेन यांनी 1978 मध्ये भरत देव वर्मा यांच्याशी विवाह केला. भरत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांच्या दोन मुली रायमा सेन (Raima Sen) आणि रिया सेन (Riya Sen) या देखील आज सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे आहेत.

सिनेमांपासून दूर, सध्या काय करत आहेत मुनमुन सेन? (Actress Moon Moon Sen)

एकेकाळी सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या मुनमुन सेन आता फारशा सिनेमांमध्ये दिसत नाहीत. त्या अधूनमधून इव्हेंट्स, पेज-3 पार्ट्या किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावताना दिसतात. अभिनयाव्यतिरिक्त त्यांना चित्रकला आणि अँटिक वस्तूंचा संग्रह करण्याची आवड आहे. शिक्षणातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून जादवपूर विद्यापीठ इथून त्यांनी कॉम्पॅरेटिव्ह लिटरेचरमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. सध्या त्या बंगाली पाककृतींवर आधारित पुस्तकावरही काम करत आहेत. जरी त्या पडद्यापासून दूर असल्या, तरीही त्यांचं नाव आजही चित्रपटसृष्टीत आदरानं घेतलं जातं.

Film Producer Struggle Life: रस्त्यावर साड्या विकल्या, नंतर 2500 कोटींचं साम्राज्य उभारलं, एक सुपरफ्लॉप फिल्म अन्...; आज लेक स्टार अभिनेता, तर सुनबाई सुपरस्टार हिरोईन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.