आजकाल किडनी स्टोन ही एक सामान्य समस्या बनली आहे. किडनी आणि पित्ताशयात लहान खडे तयार होतात, जे खूप वेदनादायी असतात. तर अशावेळेस या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण औषधोपचार आणि घरगुती उपाय करतात. मात्र आजकाल ही समस्या अधिकच सामान्य होत चालली आहे. आपण पाहतोच की तरूणांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंतच्या सर्वांना किडनी स्टोनचा त्रास होतो. सर्व लोकांना किडनी स्टोनचा त्रास होतो. तर ही समस्या निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकींच्या सवयी, वेळेवर न जेवणे हे आहे. एवढेच नाही तर शरीरात पाण्याची कमतरता असणे आणि जंकफुडचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे. ज्यामुळे किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढू शकते.
आरोग्य तज्ञांच्या मते किडनी स्टोन तयार होण्यामागे अनेक कारणे आहेत, ज्यात डिहायड्रेशन, शरीरातील खनिजांचे असंतुलन आणि काही विशिष्ट पदार्थांचे अतिसेवन यांचा समावेश आहे. अनेकदा आपल्याला याची जाणीवही नसते आणि आपण आपल्या रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करतो, जे हळूहळू किडनी स्टोन तयार होण्याच्या प्रक्रियेला चालना देतात. तर आजच्या लेखात आपण अशा पाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे किडनी स्टोन तयार होतो.
पालकाच्या भाजीमुळे किडनी स्टोनचा धोकापालक लोहाचा एक उत्तम स्रोत आहे. त्यामुळे आरोग्यासाठी पालक भाजी खूप फायदेशीर मानले जाते. मात्र दुसरीकडे विचार केला तर पालकाच्या सेवनाने तुम्हाला किडनी स्टोनचा धोकाही वाढतो. ज्या लोकांना आधीच किडनी स्टोन झाले आहेत त्यांनी पालक पूर्णपणे टाळावा. पालकामध्ये ऑक्झॅलेटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील कॅल्शियमसोबत संयोग करून स्फटिक तयार करू शकते, ज्यामुळे स्टोन तयार होतात.
सुकामेवा आणि बिया सुद्धा किडनी स्टोन साठी घातकबदाम, काजू, शेंगदाणे आणि तीळ किंवा सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या काही बियांमध्ये ऑक्झॅलेट असल्यामुळे शरीरात देखील किडनी स्टोन तयार होतात. जरी ते पौष्टिक असले तरी त्यांच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. विशेषतः ज्यांना आधीपासून किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी त्यांचे सेवन प्रमाणातच केले पाहिजे.
चॉकलेट आणि कोको उत्पादनेहेल्थलाइनच्या मते चॉकलेट आणि कोको प्रोडक्ट चवीला चांगले असले तरी, त्यांमध्ये ऑक्झॅलेटचे प्रमाणही जास्त असते. त्यांचे वारंवार किंवा मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील ऑक्झॅलेटची पातळी वाढू शकते, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. यासाठी ज्यांना स्टोनचा खुप त्रास आहे त्यांनी या पदार्थांचे सेवन प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.
जास्त मीठ असलेले अन्नवेबमेडच्या मते जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात किडनी स्टोनसह अनेक समस्या उद्भवू शकतात. जेव्हा आपण जास्त मीठ खातो, तेव्हा शरीर लघवीद्वारे अधिक कॅल्शियम बाहेर टाकते, ज्यामुळे नंतर खडे तयार होऊ शकतात. प्रक्रिया केलेले पदार्थ, पॅकेज केलेले स्नॅक्स आणि जंक फूडमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्यांचे सेवन मर्यादित करणे महत्त्वाचे आहे.
रेड मीट आणि चिकन अंडी देखील किडनी स्टोनसाठी घातकआपल्याकडे अनेकजण हे मांसाहाराचे खूप सेवन करतात. ज्यात लाल मांस आणि चिकन व अंडी यांसारख्या इतर प्रथिनांचाही समावेश आहे. यांचे अतिसेवन केल्याने शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. हे युरिक ॲसिड मूत्रपिंडात जमा होऊ शकते आणि खडे तयार होण्याची प्रक्रिया वेगवान करू शकते. संशोधनानुसार प्रथिनांचे संतुलित सेवन महत्त्वाचे आहे, परंतु त्याचे अतिसेवन टाळावे, विशेषतः जर तुम्हाला आधीपासूनच किडनी स्टोनचा त्रास असेल तर.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)