आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 43 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. राजस्थानचा हा दहावा आणि दिल्लीचा नववा सामना असणार आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थानच्या कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. तर ऑलराउंडर अक्षर पटेल याच्या खांद्यावर दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा आहे. उभयसंघातील सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कधी?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना शुक्रवारी 1 मे रोजी होणार आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कुठे?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
राजस्थानची जयपूरमधील दिल्ली विरुद्धची आकडेवारी
जयपूरमध्ये दिल्ली आणि राजस्थान यांच्यात एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. राजस्थानने या 7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 2 सामने जिंकले आहेत.