Panchang 1 May 2026 : आजचे पंचांग! बुद्ध पौर्णिमा, शुभ मुहूर्त अन् राहु काळ जाणून घ्या
esakal May 01, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:१०

☀️ सूर्यास्त – १८:५२

चंद्रोदय – १८:४५

⭐ प्रात: संध्या – ०४:५८ ते ०६:१०

⭐ सायं संध्या – १८:५२ ते २०:०४

⭐ अपराण्हकाळ – १३:४७ ते १६:१९

⭐ प्रदोषकाळ – १८:५२ ते २१:०७

⭐ निशीथ काळ – ००:०८ ते ००:५३

⭐ राहु काळ – १०:५५ ते १२:३१

⭐ यमघंट काळ – १५:४१ ते १७:१६

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– ०७:४५ ते ०९:२०

अमृत मुहूर्त– ०९:२० ते १०:५५

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२८

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०७:०० ते १०:५५ | १२:३१ ते १३:४७ | १७:१६ ते १८:०१ | २१:०७ ते २३:२३

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:१० ते ०७:०० | १३:४७ ते १७:१० | १८:०१ ते २१:०७ | २३:२३ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: १८:५० ते ००:३२ पुढील दिवस | ओहोटी: ००:३२ पुढील दिवस ते ०६:११ पुढील दिवस | भरती: ०६:११ पुढील दिवस ते १२:५५ पुढील दिवस | ओहोटी: १२:५५ पुढील दिवस ते १९:४३ पुढील दिवस

ग्रहमुखात आहुती – चंद्र (शुभ)

अग्निवास – पाताळी २२:१८ पर्यंत नंतर पृथ्वीवर

️ शिववास – २२:१८ पर्यंत श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – वसंत

मास – वैशाख

पक्ष - शुक्ल पक्ष

तिथी – पौर्णिमा (२२:१८ नं.) प्रतिपदा

वार – शुक्रवार

नक्षत्र – स्वाती (२७:५५ नं.) विशाखा

योग – सिद्धि (२०:३८ नं.) व्यतीपात

करण – भद्रा (०९:३७ नं.) बव

चंद्र रास – तुळ

सूर्य रास – मेष

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – भद्रा ०९.३७ प., स्नानदानासाठी पौर्णिमा,बुद्धपौर्णिमा, वैशाखस्नानसमाप्ति(वैशाखी कार्तिकी माघी तिथयोऽतीवपूजिता:| स्नानदानविहिनास्ता न नेया: पाण्डुनन्दन॥), जलकुंभ-तिलपात्र-सुवर्ण-घृत-मधदान, तिळाच्या तेलाचा दिवा लावणे, तिलहोम, तिलतर्पण, सम्पद् गौरी व्रत, पुष्टिपती विनायक जयंती, कूर्मजयंती(सायंकाले), सर्वेषाम् अन्वाधानं, महाराष्ट्र दिन-कामगार दिन

✅विशेष कमेंट्स वर कमेंट्स भाग ४-

जेवणाआधी कोणते श्लोक म्हणावे ? रात्री झोपताना म्हणावयाचे श्लोक. शेतीसाठी शुभ मुहूर्त , लग्न आणि घर एका वर्षात करावे का ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे बघा खालील youtube व्हिडिओमध्ये-

https://youtu.be/pUSLBLycmQs?si=QNL1vxVfDsT5uQQxं

शुभाशुभ दिवस - ०९:३७ ते २०:३८ प. शुभ दिवस

श्राद्ध तिथी - पौर्णिमा श्राद्ध

आजचे वस्त्र – पांढरे

स्नान विशेष – बडीशोप किंवा शतावरी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण करावे आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस चित्रविचित्र रंगाचे वस्त्र, सुवर्ण, रुपें, गंध, तांदूळ दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – मांस, स्त्रीसंग

दिशाशूल उपाय – दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा करण्यापूर्वी सातू खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , वृषभ , मिथुन , सिंह , कन्या , तुळ , धनु , मकर , कुंभ — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.