आजचे पंचांग आणि दिनविशेष - 01 मे 2026
esakal May 01, 2026 10:45 AM

पंचांग -

शुक्रवार : वैशाख शुद्ध १५, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.०८ सूर्यास्त ६.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४४ चंद्रास्त सकाळी ६.४३, बुद्ध पौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती, पौर्णिमा समाप्ती रात्री १०.५३, भारतीय सौर वैशाख ११ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००५ - पुणे विद्यापीठाचे ‘विद्यावाणी’ हे रेडिओ केंद्र कार्यान्वित.

  • २००५ - ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान.

  • २००७ - पुण्याची बुद्धिबळपटू ईशा करवडेने इंटरनॅशनल मास्टर या किताबाचे तिन्हीही नॉर्म पूर्ण केले. अशी कामगिरी करणारी ती भारताची केवळ चौथी, तर महाराष्ट्राची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.