रील स्टार सुरेंद्र पाटीलच्या मुसक्या आवळल्या, 12 वर्षापूर्वीच्या 'त्या' प्रकरणाचा अखेर उलगडा; घरात सापडलेल्या गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले!
सुरेश काटे May 01, 2026 04:13 PM

Surendra Patil : सोशल मीडियावर "रील स्टार" म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सुरेंद्र पाटील (Surendra Patil) याच्या मुसक्या आवळण्यात कल्याण गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. वरवर ग्लॅमरस आयुष्य जगणाऱ्या पाटीलचा 12 वर्षांपूर्वीच्या एका तरुणाचे अपहरण आणि त्याचा जीव घेतल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. 

Surendra Patil : 12 वर्षांपूर्वीचं 'ते' प्रकरण उघडकीस

2014 साली डोंबिवलीतील दावडी परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय करण बागुल या तरुणाचे अपहरण झाले होते. सुरुवातीला हे प्रकरण बेपत्ता म्हणून नोंदवले गेले होते, परंतु कल्याण गुन्हे शाखेने नव्याने तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आले. 7 एकर जमिनीच्या आर्थिक वादातून सुरेंद्र पाटीलने आपल्या साथीदारांच्या मदतीने करणचे अपहरण केले. लोखंडी रॉडने वार करून त्याला संपवल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मुरबाडच्या जंगलात फेकून दिला होता. याप्रकरणी पाटीलसह त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

Surendra Patil : चप्पल स्टँडमध्ये सापडला मोठा शस्त्रसाठा 

सुरेंद्र पाटीलच्या घरावर टाकलेल्या छाप्यात पोलीसही चक्रावून गेले. घरातील चप्पल स्टँडमध्ये लपवून ठेवलेला मोठा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये 7 रिव्हॉल्व्हर, 371 जिवंत काडतुसे, तसेच तलवारी आणि चॉपर यांसारख्या घातक शस्त्रांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि शस्त्रे कशासाठी साठवली होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

Surendra Patil : पोलीस खुर्चीत बसून बनवली होती रील

सुरेंद्र पाटील यापूर्वी 2023 मध्येही वादात सापडला होता. एका फसवणुकीच्या तक्रारीसाठी मानपाडा पोलीस ठाण्यात गेला असता, त्याने चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून रील बनवली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Surendra Patil : 14 हून अधिक गंभीर गुन्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मानपाडा, रामनगर आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यांत 14 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पोलीस कोठडीत असून, त्याच्या गुन्हेगारी साखळीचा अधिक तपास कल्याण गुन्हे शाखा करत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Nashik Court Hearing: 'अवतार पूजा कर, नाहीतर मृत्यू अटळ', खरातने साप दाखवून कशी घातली भीती? वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, न्यायाधीशांनी घेतला मोठा निर्णय

Watermelon Death Case Mumbai: मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.