एका तिकिटाच्या किंमतीत येईल आलिशान फ्लॅट! या ट्रेन पुढे 7 स्टार हॉटेल फिक्क्या, चालता-फिरता राजमहल कोणता?
Tv9 Marathi May 01, 2026 06:45 PM

Most Expensive Train in India: मुंबई अथवा उत्तर भारतातील रेल्वे पाहिल्यावर प्रचंड गर्दी, धक्काबुक्की आणि ट्रेन पकडण्यासाठीची कसरत आपल्याला घाबरवून टाकते. पण याविरुद्ध देशात पॅलेस ऑन व्हील्स म्हणून ओळखली जाणारी आलिशान रेल्वे धावते. भल्या भल्या फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलची चमक या रेल्वेपुढे फिक्की पडते. या रेल्वेचे सूट पाहाताच तुमच्या तोंडातून वॉव असाच शब्द निघतो. या चालत्या-फिरत्या राजमहलाविषयी फार कमी प्रवाशांना माहिती आहे. कोणती आहे ही आलिशान ट्रेन?

कोट्यवधींचा खर्च आणि शाही अंदाज

ही ट्रेन सजवण्यासाठी जवळपास 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रेल्वेतील सूट हे मॅक्सिकन फॅब्रिकने सजवले गेले आहेत. यामध्ये स्पा आणि इतर आलिशान सुविधा आहेत. महाराजा एक्सप्रेस असं या रेल्वेचं नाव आहे. 45 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात ही रेल्वे पहिल्यांदाच मे च्या तळपत्या उन्हात रुळावरून धावणार आहे. या रेल्वेत उदयपूरची थंडाई, जयपूरची कुल्फी आणि जैसलमेरचे खास ग्लुकॉन डी शरबत प्रवाशांच्या जीभेला चव आणेल. पण ही काही साधीसुधी ट्रेन नाही. या ट्रेनचं भाडं ऐकून अनेकांना चक्कर येते. या शाही प्रवासासाठी एका कॅबिनचे भाडे 10 लाखांपासून सुरू होऊन ते 23 लाख रुपयांपर्यंत जाते.(Maharajas Express Ticket Price) इतक्या पैशात तर शहरात एक फ्लॅट खरेदी करता येईल अथवा खेड्यात बंगला उभारता येईल.

सात रात्रींचा प्रवास आणि लाखोंचे भाडे

सप्टेंबर महिन्यापासून 7 रात्र आणि 8 व्या दिवसापर्यंत  (7 Nights Journey and Lakhs of Ticket Price) दिल्ली ते आगार आणि राजस्थानच्या प्रमुख भागाची सैर या रेल्वेतून करता येते. विशेष म्हणजे या महागड्या रेल्वेत पाऊल ठेवायलाही जागा नसते. इतका प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो. खास करून परदेशी पर्यटक आणि NRI अनेक महिने अगोदर या रेल्वेचे आसन बुक करतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी तर ही रेल्वे स्वप्नासारखीच आहे. पण ज्याने या रेल्वेतून प्रवास केला, त्याला स्वर्गीय अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. पॅलेस ऑफ व्हील्स ही नावाप्रमाणेच एक शानदार आणि ऐटदार रेल्वे आहे. यारेल्वेचा प्रवास तुम्हाला आयुष्यभर कायम लक्षात राहतो.

डिस्क्लेमर: सदर माहिती ही विविध स्त्रोतांवर आधारीत आहे. टीव्ही 9 मराठी कोणताही दावा करत नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.