'राजा शिवाजी'ची पहिल्याच दिवशी धडाकेबाज ओपनिंग; शिवरायांच्या शौर्याची देशभरात गर्जना; BOX Office कलेक्शन किती?
जयदीप मेढे May 02, 2026 10:43 AM

Raja Shivaji Box Office Collection 1st Day: गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेला 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपट 1 मे रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः इतिहास घडवला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शकरितेश देशमुख ( Riteish Deshmukh) याचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. या चित्रपटाने जबरदस्त कमाई करत धडाकेबाज ओपनिंग दिली आहे. (Box Office Collection)

पहिल्याच दिवशी किती कोटींची गर्जना!

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘राजा शिवाजी’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल ₹11.35 कोटींची कमाई केली. यामध्ये केवळ मराठी व्हर्जनमधूनच सुमारे ₹8 कोटी नेट कलेक्शन झालं. मराठी चित्रपटासाठी पहिल्या दिवशी एवढी कमाई ऐतिहासिक मानली जात आहे. फक्त 1,941 शोमधून चित्रपटाने 68% एवढी मजबूत ऑक्युपन्सी नोंदवत प्रेक्षकांची मोठी गर्दी खेचली.

ॲडव्हान्स बुकिंगनेच दिलेला संकेत

रिलीजपूर्वीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ₹5.14 कोटी ग्रॉस कमावत मोठा विक्रम केला होता. त्यापैकी मराठी व्हर्जनमधूनच अंदाजे ₹3.60 कोटी नेट जमा झाले होते. त्यामुळे पहिल्या दिवसाची दमदार कमाई होणार हे आधीच स्पष्ट झालं होतं.

‘सैराट’ आणि ‘टाईमपास 2’लाही टाकलं मागे

पहिल्या दिवसाच्या कमाईत ‘राजा शिवाजी’ने सैराट आणि टाईमपास 2 यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले. या दोन्ही चित्रपटांनी त्यांच्या ओपनिंग दिवशी सुमारे ₹3.60 कोटी कमावले होते. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही चांगली साथ दिली. हिंदी स्क्रीनिंगमधून सुमारे ₹3.35 कोटी जमा झाल्यामुळे एकूण कलेक्शन ₹10 कोटींचा टप्पा सहज पार झाला.

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि प्रमुख भूमिकेत असलेला ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमध्येच जबरदस्त कमाई करताना दिसला. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे रिलीजपूर्वीच या सिनेमाने चांगलीच चर्चा रंगवली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाची तब्बल 2,01,990 तिकीटांची विक्री झाली आहे. तब्बल 5698 शोसह प्रदर्शित होणाऱ्या या ऐतिहासिक सिनेमाकडून पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कमाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तगडी स्टारकास्ट, मोठं आकर्षण

‘राजा शिवाजी’मध्ये बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील मोठी नावं एकत्र पाहायला मिळत आहेत. यामध्ये संजय दत्त, , अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी बोमन इराणी, अमोल गुप्ते आणि जेनेलिया देशमुख यांचा समावेश आहे. याशिवाय सलमान खान याची खास केमिओ उपस्थितीही चर्चेचा विषय ठरत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.