West Bengal Elections 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Elections 2026) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Election) एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार आणि अनियमितता झाल्याच्या तक्रारींनंतर, डायमंड हार्बर आणि मगराहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एकूण 15 मतदान केंद्रांवर आज (2 मे 2026) पुन्हा मतदान घेतले जात आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानावेळी काही केंद्रांवर गोंधळ आणि नियमबाह्य प्रकार घडल्याचे अहवाल प्राप्त झाले होते. रिटर्निंग ऑफिसर आणि निरीक्षकांच्या अहवालाच्या आधारे, लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत या 15 बूथवरील मतदान रद्द ठरवण्यात आले. आज सकाळी 7 वाजल्यापासून या सर्व केंद्रांवर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.
मगराहाट पश्चिममधील ज्या बूथांवर पुन्हा मतदान होत आहे, त्यामध्ये उत्तर येरपूर एफपी स्कूल, नाझरा एफपी स्कूलच्या वेगवेगळ्या खोल्या, देउला एफपी स्कूल, घोला नोयपारा गर्ल्स हाय मदरसा, एकतारा मलाया एफपी स्कूल आणि बहिरपुया कुरकुरिया एफपी स्कूलच्या अनेक खोल्यांचा समावेश आहे.
तर डायमंड हार्बरमध्ये बागदा ज्युनिअर हाय स्कूल, चंद्रा एफपी स्कूल, हरिदेवपूर एफपी स्कूल आणि रॉयनगर एफपी स्कूलच्या प्रत्येकी एका खोलीत पुन्हा मतदान घेतले जात आहे. स्थानिक प्रशासनाने या मतदानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भागात ढोल वाजवून घोषणा केल्या आहेत, जेणेकरून मतदारांना त्यांच्या हक्काचा पुन्हा वापर करता येईल.
#WATCH | West Bengal Elections Re-polling | A voter shows her inked finger after casting a vote at booth number 117, Bagda Junior High School, in Diamond Harbour Assembly Constituency in South 24 Parganas district. pic.twitter.com/UCDYgN99lv
— ANI (@ANI) May 2, 2026
या फेरमतदानावर बोलताना विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी म्हणाले की, "मगराहाट पश्चिममध्ये जे घडले त्याचे आम्ही स्वागत करतो. वास्तविक डायमंड हार्बर आणि फाल्टा परिसरात अजून जास्त बूथवर फेरमतदान व्हायला हवे होते. ही एक निवडणूक प्रक्रिया आहे आणि आम्ही निवडणूक आयोगाचा आदर करतो."
पश्चिम बंगालमध्ये यंदा दोन टप्प्यांत (23 एप्रिल आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. या निवडणुकीत आतापर्यंत 92.47 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. या महासंग्रामाचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कोलकातासह संवेदनशील भागात जमावबंदी लागू केली आहे.
आणखी वाचा