8th Pay Commission: तुमच्या पगारातील DA आणि HRA मध्ये नेमका फरक काय? सोप्या भाषेत समजून घ्या
esakal May 02, 2026 01:45 PM

DA: आपण सर्व सध्या आठव्या वेतन आयोगाबद्दल ऐकतो, त्यात केवळ फिटमेंट फॅक्टर आणि मूळ वेतनावरच मोठी चर्चा होताना दिसते. परंतु तुमच्या मासिक वेतनाची गणना केवळ मूळ वेतनापुरती मर्यादित नसते. हातात येणाऱ्या प्रत्यक्ष वेतनामध्ये अनेक भत्त्यांचा समावेश असतो. दरम्यान, गेल्या आठवड्यात अर्थ मंत्रालयाने केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्या म्हणजेच DA बदलांची घोषणा केली. यानुसार, DA मूळ वेतनाच्या 58% वरून 60% पर्यंत वाढवला आहे.

महागाई भत्ता (DA) साधारणपणे अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI) आधारावर वर्षातून दोनदा सुधारित केला जातो. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा मिळतो. नवीन घोषणा साधारणपणे मार्च आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला केल्या जातात आणि त्यांची अंमलबजावणी जानेवारी आणि जुलैमध्ये केली जाते. हा भत्ता कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाची एक निश्चित टक्केवारी असतो. वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं? DA आणि HRA यांमधील फरक

महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) हे वेतनाचे दोन वेगवेगळे घटक आहेत. दोन्हींवर वेगवेगळ्या प्रकारे कर आकारला जातो.

  • DA म्हणजे महागाईपासून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पगारासोबत दिली जाणारी रक्कम.

  • तर भाड्याच्या निवासस्थानासाठी सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्याला HRA म्हणतात.

  • DA हा फक्त सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी तसेच PSU कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर HRA सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना दिला जातो.

  • DA पूर्णपणे करपात्र आहे आणि त्यावर कोणतीही सूट मिळत नाही. आयकर नियमांनुसार, DA चा भाग करदात्याच्या ITR मध्ये स्वतंत्रपणे दाखविणे आवश्यक आहे.

  • HRA वर आयकर कायद्यानुसार एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सूट आहे.

  • सातव्या वेतन आयोगाने शहरांची त्यांच्या लोकसंख्येनुसार तीन श्रेणींमध्ये विभागणी केली. यामध्ये महानगरे, मोठी शहरे आणि लहान शहरे यांचा समावेश आहे.

DA हा CTC भाग आहे का?

महागाई भत्ता (DA) हा कर्मचाऱ्यांच्या CTC म्हणजेच ‘कॉस्ट टू कंपनी’चा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना हा भत्ता दरमहा पगारासोबत दिला जातो. DA मोजताना 50 पैशांपेक्षा जास्त रक्कम असेल तर ती पुढील 1 रुपयात धरली जाते, तर 50 पैशांपेक्षा कमी रक्कम सोडून दिली जाते.

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार? DA वाढीचा फायदा कोणाला?

DA वाढीमध्ये 50 लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि अंदाजे 65 लाख सेवानिवृत्त केंद्र सरकारी पेन्शनधारकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांचे 18 वेगवेगळे स्तर आहेत. प्रत्येक कर्मचारी किंवा पेन्शनधारकाला मिळणारी वाढ त्यांच्या स्तरावर अवलंबून असेल. या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन प्रत्येक स्तरावर वेगवेगळे असते. दर 10 वर्षांनी, सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करते. सध्या, 8वा वेतन आयोग स्थापन करण्यात आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.