बारावीच्या निकालात कोकण विभागाची सरशी, तर मुलींनी मारली बाजी; नागपूरसह विदर्भाची टक्केवारी किती?
विशाल देवकर May 02, 2026 03:13 PM

Maharashtra HSC 12th Result 2026:  राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता लागून राहिलेला बारावीचा निकाल (HSC Exam Result 2026) अखेर जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षे (HSC Exam Result 2026) दरवर्षी प्रमाणं मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी 93.15% टक्के तर मुलांची 86.80% इतकी आहे. तर 9 विभागीय मंडळाचा मिळून राज्याचा निकाल 89.79 टक्के इतका लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळमार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. मात्र राज्याच्या निकालाचा टक्का पुन्हा घसरला असून गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी टक्के निकाल लागल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळ अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत दिली. एकंदरीत नागपूर विभागासह राज्याच्या निकालाची आकडेवारी नेमकी काय हे आपण जाणून घेऊ

Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा विभागनिहाय निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा निकाल जाहीर

कोकण 94.14 

पुणे 91.25 

अमरावती 90.92

नाशिक 90.72

मुंबई 90.08 

कोल्हापूर 89. 97

छत्रपती संभाजीनगर 88.68

नागपूर 88.67

लातूर 84.14 

दुपारी एक वाजल्यानंतर ऑनलाईन निकाल जाहीर होणार

राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार

सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा

Maharashtra HSC Exam Result 2026: या वेबसाईटवर दिसणार निकाल

दुपारी 1 वाजता खालील अधिकृत वेबसाईटवर निकाल उपलब्ध होईल.

https://hscresult.mkcl.org/

https://hscresult.mahahsscboard.in/

https://mahresult.nic.in/

Maharashtra HSC Exam Result 2026: निकालासाठी काय लागेल?

1. विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)

2. आईचे नाव (Mother's First Name)

Maharashtra HSC Exam Result 2026: निकाल कसा पाहायचा?

mahresult.nic.inhscresult.mkcl.orgmahahsscboard.in यातील कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

'HSC Examination Result 2025' लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर (Roll Number/Seat Number) टाका.

तुमच्या आईचे पहिले नाव टाका.

'View Result' वर क्लिक करा.

निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंटआऊट किंवा स्क्रीनशॉट घ्या.

Maharashtra HSC Exam Result 2026: SMS वर निकाल पाहण्यासाठी काय करावे?

निकाल जाहीर झाल्यावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी वेबसाईटवर येतात, ज्यामुळे सर्व्हर स्लो होण्याची किंवा वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते. अशा वेळी विद्यार्थी SMS द्वारे आपला निकाल त्वरित मिळवू शकतात.

Maharashtra HSC Exam Result 2026: काय मेसेज टाईप कराल?

12वीचा निकाल एसएमएसद्वारे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHHSC” असं टाकून 57766 वर SMS सेंड करायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMS च्या माध्यमातून दिसणार आहे. 

यंदा राज्याचा 89.79 टक्के निकाल 
सर्व विभागीय मंडळातू कोकण विभागाची सरशी  - 94.14%
सर्व विभागीय मंडळातू लातूर विभाग तळाला - 84.14%
मुली- 93.15%
मुलं - 86.80%
6. 35 % मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण 
नऊ विभागीय मंडळातून राज्यात एकूण 14 लाख 58 हजार एवढ्या मुलांनी दिली परीक्षा
सलग पाचव्या वर्षी निकालाचा  टक्का घसरला
परीक्षेसाठी 2 हजार मॅट्रीक टॅन कागदाचा वापर 
डिजिटल सुरक्षा प्रयोग यशस्वी
पहिल्यांदाच मार्क शीट आणि प्रशस्तीपत्र एकाच वेळी विद्यार्थ्यांना मिळणार 
3 कोटी रुपयांची बचत 
पहिल्यांदाच आधार प्रमाणेच निकालावर विद्यार्थ्यांचं नाव असणार 
विदार्थ्यांसाठी समुपदेशनाची सेवा, टोल फ्री नंबर 14416, 315 समुपदेशन (Counseling)

राज्यभरातील गैरप्रकारांची प्रकरण :
तोतयागिरी प्रकरण -1(लातूर
कॉपी प्रकरण - 237
सामूहिक कॉपी प्रकरण - 1469
इतर 53 प्रकरण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.