Indian Tea Time Snack Recipes: सकाळच्या नाश्त्यात काहीतरी झणझणीत, कुरकुरीत आणि पोटभर खायला मिळालं की दिवसच भारी जातो. रोजची पोहे-उपमा किंवा ब्रेड-बटर याला ब्रेक देण्यासाठी मसूर डाळ वडे हा एक जबरदस्त पर्याय आहे. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि मसाल्यांनी भरलेला हा वडा चहा किंवा हिरवी चटणीसोबत इतका छान लागतो की समोसा-कचोरीही फिके पडतील!
साहित्य1 कप मसूर डाळ
2 हिरव्या मिरच्या
4 लसूण पाकळ्या
1 इंच आले
1/2 चमचा काळी मिरी पावडर
1 चमचा जिरा पावडर
1 कांदा (बारीक चिरलेला)
2 चमचे कोथिंबीर (बारीक चिरलेली)
चवीनुसार मीठ
2–4 चमचे सरसों तेल (तळण्यासाठी)
मसूर डाळ नीट 3–4 वेळा धुऊन साधारण 1 तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ मऊ होते आणि वडे छान फुलतात.
भिजलेली डाळ पाणी काढून मिक्सरमध्ये टाका. त्यात लसूण, आले आणि हिरव्या मिरच्या घालून थोडं पाणी घालत जाडसर पेस्ट तयार करा. पेस्ट फार पातळ नसावी, नाहीतर वडे नीट बनणार नाहीत.
आता तयार पेस्ट एका भांड्यात काढा. त्यात मीठ, काळी मिरी पावडर, जिरा पावडर आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिसळा. शेवटी बारीक चिरलेला कांदा घालून हलक्या हाताने मिक्स करा.
कढईत तेल गरम करा. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे किंवा चपटा आकार देऊन तेलात सोडा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
गरमागरम मसूर डाळ वडे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. चहा सोबत हे वडे खाल्ले तर सकाळचा मूड एकदम फ्रेश होतो!
Protein Packed Breakfast Recipe: प्रोटीनचा पॉवरहाऊस! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल खमंग चणा डाळ पराठा