लष्कराला स्वदेशी स्टेल्थ ड्रोन मिळणार आहेत
Marathi May 02, 2026 12:25 PM

डीआरडीओ प्रमुखांनी दिली माहिती : कावेरी इंजिनची मिळणार शक्ती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय वायुदलाला लवकरच स्वदेशी स्टील्थ ड्रोन मिळणार आहेत. डीआरडीओचे प्रमुख डॉ. समीर व्ही. कामत यांनी एका कार्यक्रमात या स्वदेशी अनमॅन्ड प्लॅटफॉर्मची अनेक वैशिष्ट्यो नमूद केली आहेत. ‘घातक’ अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल व्हीकलची (युसीएव्ही) मारक क्षमता ही विदेशी स्टील्थ ड्रोनच्या तोडीस तोड असणार आहेत.

‘घातक’ ड्रोन आकार-प्रकार आणि वजनात अत्याधुनिक लढाऊ विमानाप्रमाणेच असेल आणि तुलनात्मक स्वरुपात हा स्वदेशी हलके लढाऊ विमान (एलसीए) तेजस एमके1 प्रमाणे असेल अशी माहिती डीआरडीओ प्रमुख कामत यांनी एएनआय नॅशनल सिक्युरिटी समिट 2.0 मध्ये बोलताना दिली.

घातक युसीएव्ही हे लढाऊ विमानांप्रमाणेच असतील, हे स्टील्थ फायटरसमान असतील, याचमुळे हे सुमारे 13-टन क्लासचे असतील, एलसीए-टाइप फायटर एअरक्राफ्टसारखे हे स्वरुप असेल. दीर्घकाळात वायुदलाकडे त्यांची किती संख्या असेल हे मी निश्चितपणे सांगू शकत नाही, परंतु डीपीबीने (संरक्षण अधिग्रहण परिषद) मंजुरी दिलेले प्रमाण पाहता ही संख्या 67 राहू शकते.

डॉ. समीर व्ही. कामत, डीआरडीओ प्रमुख

घातक ड्रोनला स्वदेशी कावेरी इंजिन पुरविणार बळ

-संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून अलिकडेच अनुमानित 39 हजार कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने या ड्रोनच्या कार्यक्रमाला नवा वेग मिळाला आहे. -घातक स्टील्थ ड्रोनला स्वदेशी कावेरी (ड्राय-डेरिवेटिव) इंजिनद्वारे शक्ती मिळणार आहे ही सर्वात मोठी गर्वाची बाब असणार आहे.

-49 नॉट थर्स्टच्या संभाव्य क्षमतेमुळे हा घातक स्टील्थ ड्रोन सबसोनिक स्टील्थ प्लॅटफॉर्मसाठी पूर्णपणे फिट असणार आहे.

-यामुळे याची फ्यूल एफिशिएंसी देखील अधिक असेल आणि हे अधिक वेळापर्यंत उ•ाण (सुमारे 8 तास) करू शकणार आहे.

घातक ड्रोनला जोडली जाणार शस्त्रास्त्रs

-स्टील्थ क्षमतेमुळे हा ड्रोन शत्रूंचे रडार आणि क्षेपणास्त्रांना चकविण्यास पूर्णपणे सक्षम असेल. त्यांना या ड्रोनचा सुगावा लावता येणार नाही.

-अवघडातील अवघड आव्हानांमध्ये देखील घातक ड्रोन स्वत:ला शत्रूच्या रडारांपासून वाचविण्यास सक्षम असणार आहे.

-स्टीथ प्रोफाइल कायम ठेवण्यासाठी या घातक ड्रोनच्या बाहेरील हिस्स्याला पेलोडपासून पूर्णपणे वेगळे ठेवण्यात येणार आहे.

-याच्या जागी घातक ड्रोनमध्ये दोन इंटरर्नल वेपन बे असतील, ज्यांची अनुमानित पेलोड क्षमता 1.5 टनाची असणार आहे.

अत्याधुकि ड्रोनमध्ये सामील

घातक युसीएव्हीची स्टील्थ क्षमता याला प्रिसिजन गायडेड म्युनिशन्स म्हणजेच स्मार्ट एंटी-एअरफील्ड वेपन आणि अॅडव्हान्स्ड ग्लाइड बॉम्बने हल्ला करण्यास सक्षम करते. यामुळे हा ड्रोन शत्रूच्या भागात कुठलाच सुगावा न लागू देता दूरपर्यंत शिरून लक्ष्यावर निशाणा साधू शकतो. घातक ड्रोनचा आकार-प्रकार तेजस लढाऊ विमानाप्रमाणे असल्याने हे जगभरात अवजड पेलोड घेत शत्रूंना टार्गेट करणाऱ्या अत्याधुनिक आणि हेवी-ड्युटी स्ट्राइक ड्रोनच्या श्रेणीत येतो.

अधिक इंधन भरण्याची क्षमता

-सुमारे 14 मीटर लांब आणि 18 मीटरपर्यंत पंखाच्या फैलावामुळे याची इंधन बाळगण्याची क्षमता वाढली आहे. यामुळे हा ड्रोन दीर्घकाळापर्यंत आकाशात उ•ाण करत राहू शकतो.

-या ड्रोनमध्ये कॉकपिट नसल्याने आणि वैमानिक नसल्याने लाइफ-सपोर्ट सिस्टीमची आवश्यकता नसेल, ज्यामुळे हा स्वत:च्या आकाराच्या लढाऊ विमानापेक्षा अधिक इंधन सामावू शकणार आहे.

शत्रूंसाठी खऱ्या अर्थाने ‘घातक’

स्वदेशी इंजिनचा वापर, शस्त्रास्त्रांचा पेलोड आत ठेवण्याची क्षमता आणि अत्याधुनिक स्टील्थ तंत्रज्ञान संरक्षण एअरोस्पेसध्ये भारताच्या क्षमतेसाठी हे अत्यंत मोठे यश आहे. अशास्थितीत याची 1 हजार किलोमीटरपर्यंत शत्रूच्या भागात शिरून हल्ले करण्याची क्षमता पाहता हा अत्यंत ‘घातक’ ठरतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.