पंचांग -
शनिवार : वैशाख कृष्ण १, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ६.०८ सूर्यास्त ६.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३७ चंद्रास्त सकाळी ६.४२, नारद जयंती, भारतीय सौर वैशाख १२ शके १९४८.
दिनविशेष -
१९९६ - बंगळूरच्या रामन रिसर्च इन्स्टिट्यूटचे मानद संचालक वेंकटरामन राधाकृष्णन यांची अमेरिकेच्या ‘ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’वर निवड.
२००६ - ओरिसाचा पाच वर्षांचा धावपटू बुधिया सिंह याने जगन्नाथ पुरी ते भुवनेश्वर असे ६५ किलोमीटर अंतर सात तास दोन मिनिटे या कालावधीत पूर्ण केले व ही विस्मयकारक कामगिरी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये नोंदविली.