भोरमधील चिमुकलीसोबत काय घडलं?, कुठे घडलं, नराधम कसा सापडला? पोलिसांनी आरोपीच्या अत्याचाराचीही क्रूर कृत्यांची दिली माहिती
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे May 02, 2026 07:13 PM

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार (Bhor Crime News) करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. पीडित मुलगी शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राम मंदिर परिसरातून बेपत्ता (Bhor Crime News) झाली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गावातील सीसीटीव्ही तपासले असता, आरोपी त्या मुलीला घेऊन गोठ्याच्या दिशेने जाताना दिसला. यावरून संशय बळावला. ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत आरोपीला बनेश्वर फाटा परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची (Bhor Crime News) उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आणि मृतदेह लपवलेली जागा सांगितली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलेला चिमुकलीचा मृतदेह पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी बाहेर काढला. ही घटना समोर येताच नसरापूरमध्ये मोठा (Bhor Crime News) तणाव निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांना घेराव घातला. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी बेंगळुरू-मुंबई महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन केले. तसेच शनिवारी नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पुणे पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांची समजूत काढली. या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.(Bhor Crime News)

तर या घटनेत एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर एका 65 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वासरू दाखवतो म्हणत चिमुरडीला नेलं अन् तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नराधम आरोपीने अत्याचारानंतर चिमुरडीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यातच शेणाखाली लपवून ठेवला. शोध घेत असताना कुटुंबीयांनी सीसीटीव्ही चेक केला तेव्हा  ती जनावरांच्या गोठ्यात जाताना दिसली. याबाबत पुणे ग्रामीणचे एसपी संदीपसिंग गिल यांनी देखील आज माध्यमांना माहिती दिली आहे.(Bhor Crime News)

Pune Police on Bhor case: काय म्हणाले एसपी संदीपसिंग गिल?

काल नसरापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. संध्याकाळी चारच्या आसपास ही घटना घडली. त्यानंतर सव्वा पाच वाजता ही घटना पोलिसांकडे रिपोर्ट करण्यात आली. आम्ही त्याचा तातडीने शोध सुरू केला अन् दीड तासात आरोपीला ताब्यात घेतलं. पण दुर्दैवाने तोपर्यंत अत्याचार आणि हत्या झाली होती. आरोपीला अटक केल्यानंतर आता आमचा तपास चालू आहे, अशी माहिती संदीप गिल यांनी दिली आहे.

Pune Police on Bhor case: आरोपीविरुद्ध आधीही दोन गुन्हे झालेले दाखल

आम्ही तातडीने चार्जशीट दाखल करण्याचं आश्वासन लोकांना दिलं आहे. तसेच केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचा प्रयत्न चालू आहे. आमची विशेष टीम याचा तपास करत आहे. आरोपीविरुद्ध गुन्हे आधीही दाखल आहेत. 1998 मध्ये त्याने विनयभंगचा गुन्हा केला होता. त्यानंतर 2015 मध्ये त्याच्यावर पोस्को आणि विनयभंग गुन्हा दाखल झाला होता, पण 2019 मध्ये त्याची सुटका झाली होती. आरोपीची मानसिकताच अशी आहे, 65 वर्षाचा आरोपी हा आजुबाजूला मजूर म्हणून काम करत होता, असंही त्यांनी माहिती देताना सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर मुलगी अचानक दिसेनाशी झाल्यानंतर तिचा शोध सुरू झाला. तिच्या कुटूंबियांनी तिचा तातडीने शोध घेतला पण ती कुठंच दिसली नाही. याचदरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संबंधित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.

Pune Crime News: म्हाळुंगे हद्दीत तीन वर्षाच्या अल्पवयीन चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या

भेर नसरापूरची लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरण ताजं असतानाच आता चाकणच्या म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षाच्या अल्पवयीन चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मूळचा बिहार राज्यातील असलेल्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणाने हे कृत्य केलं असल्याने दक्षिण महाळुंगे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेश मधील असून काम निमित्तानं केलं चाकण परिसरात वास्तव्यास होते.अधिक तपास पोलिस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.