New Born: बाळाच्या रुमचं इंटिरियर कसं असावं?
Marathi May 02, 2026 08:25 PM

संपूर्ण घर सजवणं आणि घरातील बाळाची रुम सजवणं यात बराच फऱक असतो. कारण बाळाची रुम सजवताना सौंदर्याबरोबरच सुरक्षितता, आराम आणि स्वच्छता यांना खूप महत्त्व असतं. म्हणूनच बाळाच्या रुमचे इंटिरियर कसे असावे ते बघूया.

1. हलके आणि शांत रंग

भिंतींसाठी पेस्टल रंग (फिकट गुलाबी, आकाशी, हलका पिवळा, मिंट ग्रीन) वापरले तर बाळाला शांत वातावरण मिळतं.

2. सुरक्षित फर्निचर

बाळाच्या रुममध्ये कोपरे, टोकदार नसलेले फर्निचर वापरावे.

बाळासाठी मजबूत आणि सुरक्षित पाळणा घ्यावा.

फर्निचर भिंतीला नीट फिक्स केलेलं असावं

3. मऊ आणि आरामदायी बेडिंग

बाळाची गादी मऊ असावी त्यावर स्वच्छ चादर वापरावी.

जास्त उशा किंवा खेळणी पाळण्यात ठेवू नयेत

4. पात्र प्रकाशयोजना

बाळाच्या रुममध्ये खूप तीव्र सूर्यकिरणे येणार नाहीत याची काळजी घ्या.

नाईट लॅम्प वापरल्यास रात्री बाळाला डि्स्टब होत नाही हे पाहावे.

5. भिंतीवर आकर्षक डेकोरेशन

बाळाच्या रुमच्या भिंतीवर कार्टून, प्राणी, तारे-चांदण्या यांचे वॉल स्टिकर्स लावावे

रंगीबेरंगी पण जास्त गोंधळ नसलेले डिझाइन ठेवावे.

6. हवा खेळती ठेवा

बाळाच्या खोलीत नैसर्गिक हवा आणि प्रकाश येईल याची काळजी घ्यावी.

खिडक्या सुरक्षित जाळीने झाकलेल्या असाव्यात.

7. स्टोरेज व्यवस्थित ठेवावे

बाळाचे कपडे, डायपर्स, खेळणी यासाठी वेगळे कपाट/ड्रॉवर ठेवावे.

सर्व वस्तू सहज मिळतील अशा पद्धतीने ठेवाव्यात.

8. स्वच्छता आणि हायजीन

बाळाची रुम दररोज स्वच्छ ठेवावी

धूळ जमा होणार नाही याची काळजी घ्यावी.

9. सॉफ्ट फ्लोअरिंग

गालिचा किंवा मॅट वापरा जेणेकरून बाळाला आराम मिळेल

10. आवाज कमी ठेवावा

बाळाला शांत झोप मिळण्यासाठी रुममध्ये शांतता राखावी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.