Ambegaon HSC Result: आंबेगाव तालुक्यात बारावीचा ९४.११ टक्के निकाल; फक्त तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा शंभर टक्के यश
esakal May 02, 2026 09:45 PM

मंचर : आंबेगाव तालुक्यातील २१ कनिष्ट महाविद्यालयांचा इयत्ता बारावीचा एकूण निकाल ९४.११ टक्के लागला आहे. एकूण दोन हजार १९२ विद्याथ्यापैकी दोन हजार १५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी तीन कनिष्ट महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. अशी माहिती आंबेगाव तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका यांनी दिली.

ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी मंचर येथे ओम संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनीची गर्दी झाली होती. १०० टक्के निकाल लागलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. विद्यार्थी एकमेकांना मोबाईलद्वारे संपर्क करून किती गुण मिळाले याविषयी माहिती घेत होते. डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज वाणिज्य-विज्ञान (लांडेवाडी), शासकीय आश्रम शाळा विज्ञान-कला (गोहे बुद्रक), संगमेश्वर बाबुराव गेनू ढोबळे विद्यालय विज्ञान व वाणिज्य (पारगाव-शिंगवे) या महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

अन्य विद्यालय नाव व टक्के : अण्णासाहेब आवटे कनिष्ठ महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान मंचर (९५.२ टक्के), महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज विज्ञान, वाणिज्य शाखा मंचर (९९.४८ टक्के), जनता विद्या मंदिर कला वाणिज्य व विज्ञान घोडेगाव (९४.४७ टक्के), श्री भैरवनाथ विद्याधाम वाणिज्य व कला लोणी (७४.४१ टक्के), नरसिंह ज्युनिअर कॉलेज वाणिज्य रांजणी (६५.३८ टक्के), श्री. टी. एस. बो-हाडे ज्युनिअर कॉलेज विज्ञान व कला शिनोली(८०.७५ टक्के),

श्रीमान निवृत्तिशेठ दाजी पवळे वाणिज्य, कला व विज्ञान पेठ(९४.३२ टक्के), कमलजादेवी विद्यालय कला कळंब (८७.५३ टक्के), शिवशंकर विद्यालय ज्युनिअर कॉलेज कला तळेघर(९१.६५ टक्के), दत्तात्रय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान व वाणिज्य पारगाव साखर कारखाना (९१.११ टक्के), जनता विद्या मंदिर किमान कौशल्य घोडेगाव (९२.८५टक्के), भैरवनाथ माध्यमिक किमान कौशल्य अवसरी खुर्द (८५.२९ टक्के), पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कला निरगुडसर (६६.६५ टक्के). श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज विज्ञान धामणी (८८.८८ टक्के). हुतात्मा बाबु गेनु विद्यालय विज्ञान महाळुंगे पडवळ, (९७.६१टक्के) श्री पंढरीनाथ विद्यालय कला शाखा पोखरी (८७.५० टक्के) श्री भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज विज्ञान शिंगवे (९८.४३टक्के). विद्या विकास मंदिर विज्ञान अवसरी बुद्रूक (९८.८७ टक्के). संगमेश्वर बाबुराव गेनू ढोबळे विद्यालय कला (९३.७५ टक्के) व कनिष्ट

दृष्टीक्षेपात:

  • आंबेगाव तालुका इयत्ता १२ वी निकाल एकूण ९४.११ टक्के.

  • एकूण नोंदणी केलेले विद्यार्थी – दोन हजार १९२

  • एकूण प्रत्यक्ष बसलेले विद्यार्थी- दोन हजार १५७

  • एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - दोन हजार ३०

  • विशेष योग्यता ८४, प्रथम श्रेणी ३५७, द्वितीय श्रेणी एक हजार २११

गेल्यावर्षी एकूण निकाल ९५.६६ टक्के व १०० टक्के निकाल लागलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या सात होती.या वर्षी निकालात घट झाली असून ९४.११ टक्के निकाल लागला आहे. फक्त तीन कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.