रिलायन्स जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओकडे देशभरात सुमारे 51 कोटी ग्राहकांचा मोठा यूजरबेस आहे. जिओच्या यादीत प्रत्येक बजेट कॅटेगरीमध्ये अनेक प्लॅन उपलब्ध आहेत.
जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन स्वस्त आणि दमदार रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. तुम्हाला जास्त डेटा हवा असेल आणि OTT स्ट्रीमिंगचा आनंद घ्यायचा असेल तर जिओचे हे प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
जिओच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची किंमत फक्त 149 रुपये आणि 200 रुपये आहे. जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता आणि 10GB डेटा मिळतो. यासोबतच कंपनी 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शनही देते.
जिओचा 200 रुपयांचा प्लॅन हा एक मेगा कंटेंट अॅड-ऑन प्लान आहे. हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या OTT अॅप्ससाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही.
जिओ या 200 रुपयांच्या प्लॅनसोबत मोबाइल वापरकर्त्यांना YouTube Premium, Prime Video, Sony Liv, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT आणि Hoichoi यांसारख्या अनेक अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देते.