IPL 2026: मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात, कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की…
Tv9 Marathi May 03, 2026 03:45 AM

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका सुरूच आहे. या स्पर्धेतील सातव्या पराभवाची नोंद केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ पैकी सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यासह आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफचं आशा धूसर झाल्या आहेत. आता प्लेऑफचं गणित रामभरोसे असणार आहे. खरं तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर 16 गुणांचं गणित सुटणं आवश्यक असतं. पण सातव्या पराभवानंतर आता हे गणित काही सुटणार नाही. आता स्पर्धेत मुंबई इंडियन्सला फक्त पाच सामने खेळायचे आहे. या पाच सामन्यात विजय मिळवला तरी 14 गुण होतील. त्यामुळे उर्वरित पाच सामने औपचारिकता असणार आहे. असं असताना सातव्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘हा हंगाम आमच्यासाठी योग्य नव्हता. ते अधिक चांगला खेळले, त्यांनी अधिक चांगली गोलंदाजी केली, त्यांनी अधिक चांगले क्षेत्ररक्षण केले आणि त्यांनी अधिक चांगली फलंदाजी केली. 180-190 ही एक चांगली धावसंख्या असायला हवी होती. आम्हाला लय साधता आली नाही. हा सामना अधिक विचारपूर्वक खेळण्यावर अवलंबून होता. एकंदरीत, गोलंदाजी विभागात ते सरस होते आणि फलंदाजी विभागात आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले नव्हतो. आमच्याकडे गोलंदाजीचे जे पर्याय होते, तेच आम्ही वापरले.’ आता एखादा चमत्कार घडला तरच मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये संधी मिळू शकते. पण हे गणित जर तरचं आहे. सद्यस्थिती पाहता ते कठीण दिसत आहे.

आयपीएल स्पर्धेतील टॉप 4 मध्ये पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहे. पंजाब किंग्सच्या पारड्यात 8 सामन्यानंतर 13 गुण आहेत. तर आरसीबीचे 9 सामन्यात 12, सनरायझर्स हैदराबादचे 9 सामन्यात 12 गुण आणि राजस्थान रॉयल्सचे 10 सामन्यात 12 गुण आहे. या टॉपच्या चार संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला तर मुंबईचं टॉप 4 मधून आऊट होईल. त्यामुळे आता या संघांच्या प्रत्येक विजयावर या संघाची स्पर्धेतील टॉप 4 मधील एक जागा जाईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.