How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?
esakal May 03, 2026 04:45 AM

What Mumbai Indian Need to Reach Playoffs : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सवर दुसऱ्या विजयाची नोंद केली. मुंबईचे १६० धावांचे लक्ष्य चेन्नईने सहज पार केले आणि ९ सामन्यांतील हा त्यांचा चौथा विजय ठरला. उर्वरित ५ सामने जिंकून ते १८ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत राहू शकतात. पण, मुंबईचं काय? ते जेमतेम १४ गुणांपर्यंतच पोहोचू शकतात आणि प्ले ऑफसाठी ही गुणसंख्या पुरेशी आहे का?

Mumbai Indians Remaining Matches
  • ४ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, मुंबई

  • १० मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, रायपूर

  • १४ मे - पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, धर्मशाला

  • २० मे - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, कोलकाता

  • २४ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई

फलंदाजीत असातत्य...

मुंबई इंडियन्सला या पर्वात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात अपयश आले. फलंदाजीत रायन रिकेल्टन ( २९७) व नमन धीर ( २३३) हे सोडल्यास अन्य फलंदाज दोनशेपार पोहोचू शकलेले नाही. तिलक वर्मा ( १९३) व सूर्यकुमार यादव ( १८३) यांची सरासरी ही अनुक्रमे २४ व २० इतकी कमी राहिली आहे. हार्दिक पांड्यानेही २० च्या सरासरीने १४६ धावा केल्या आहेत, तर रोहित शर्मा ४ सामन्यांत १३७ धावांवर आहे.

जसप्रीतसह गोलंदाजांचे अपयश

गोलंदाजीतही मुंबईचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह ९ सामन्यांत केवळ ३ विकेट्स घेऊ शकला आहे आणि हिच मोठी डोकेदुखी आहे. तेच हार्दिकलाही ४ विकेट घेता आल्या आहेत. अल्लाह गजनफर ( ११) सोडल्यास मुंबईच्या अन्य गोलंदाजांनी निराश केले. अश्वनी कुमार ( ६) ने मिळालेल्या संधीचं सोनं केलं, परंतु त्याला ३ सामनेच खेळवले गेले. शार्दूल ठाकूरला ७ सामन्यांत ६ विकेट्स घेता आल्या. दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेलेल्या मिचेल सँटनरने ४ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या.

क्षेत्ररक्षणात चूका

मुंबई इंडियन्स क्षेत्ररक्षणात बऱ्याच चूका केला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ट्रॅव्हिस हेडच्या तीन कॅच टाकल्या गेल्या आणि ऑसी फलंदाजाने नंतर मॅचविनिंग ७६ धावांची खेळी केली. त्यात पंजाब किंग्सविरुद्ध जसप्रीत बुमराहने प्रभसिमनर सिंगचा ११ धावांवर झेल टाकला आणि त्याने ८० धााव कुटल्या. कोलकाताविरुद्ध रोहितने लाँग ऑफवर अंगकृश रघुवंशीचा सोडलेला झेल महागात पडला. त्याने २९ चेंडूंत ५५ धावांची मॅच विनिंग खेळी केली.

मुंबईचे पॅकअप

पंजाब किंग्स १३ गुणांसह अव्वल आहेत, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स हे प्रत्येकी १२ गुणांसह अव्वल चारमध्ये आहेत. पंजाबचे ६ व अन्य तीन संघांचे प्रत्येकी पाच सामने शिल्लक आहेत आणि यातील २-३ सामने जिंकून ते सहज १४ गुणांच्या पुढे जाऊ शकतात. अशात मुंबईचे आव्हान इथेच संपतेय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.