पुणे : नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचारकरून तिचा खून केल्याच्या गुन्ह्याचा तातडीने तपास करून आरोपीविरोधात त्वरित आरोपपत्र दाखल केले जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण पोलिसांनी एक ते दीड तासांत आरोपी कांबळेला ताब्यात घेतले. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. आरोपीविरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल केले जाईल; तसेच न्यायालयात जलदगतीने खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील,' असेही त्यांनी सांगितले.
कांबळे याच्या विरोधात १९९८ मध्ये विनयभंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला होता, परंतु त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि दुसरा गुन्हा २०१५ मध्ये त्यांच्या विरोधात दाखल झाला; मात्र, त्यांची दूरची नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीने तक्रार मागे घेतली,' असेही गिल यांनी सांगितले.