Hardik Pandya Reaction : रवी शास्त्रींनी विचारलं, आजचा दिवस तुझा नव्हता? हार्दिक म्हणाला, दिवसाचं काय घेऊन बसलात, हे हंगाम...
esakal May 03, 2026 03:45 AM

Hardik Pandya admits Mumbai Indians poor season IPL 2026 : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सातव्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सने १८.१ षटकांत २ बाद १६० धावा करून मुंबईवर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. कर्णधार ऋतुराज गायकवाड व कार्तिक शर्मा यांच्या अर्धशतकांनी CSK चा विजय पक्का केला. मुंबईचा संघ आजही फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात अपयशी ठरला. या पराभवामुळे मुंबईचे प्ले ऑफमधील आव्हान जवळजवळ संपल्यात जमा झाले आहे आणि सामन्यानंतर हार्दिक पांड्याची खचलेली देहबोली हेच सांगत होती.

नमन धीर ( ५७), रायन रिकल्टन ( ३७) यांमी चांगला खेळ केला होता, पंरतु मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ते ७ बाद १५९ धावांपर्यंतच पोहोचू शकले, अपेक्षा १८० धावांची होती. चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. अंशुल कंबोजने तीन, तर नूर अहमदने दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनचा दुसऱ्याच षटकात झेल टाकला गेला होता, परंतु नशीबाने जसप्रीत बुमराहने शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवली.

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

कर्णधार ऋतुराज ४८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६७ धावांवर नाबाद राहिला. त्याने उर्विल पटेलसोबत ( २४) चांगली भागीदारी केली. त्यानंतर त्याला कार्तिक शर्माची साथ मिळाली. कार्तिकने ४० चेंडूंत ५४ धावा करताना ४ षटकार व ३ चौकार लगावले. त्याने ऋतुसह ९८ धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाला १८.१ षटकांत विजय मिळवून दिला. मुंबईसाठी जस्सी व अल्लाह गजनफर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

  • या सामन्यानंतर रवी शास्त्रींनी मुंबईच्या कर्णधाराला विचारले... हार्दिक, आजचा दिवस तुझा नव्हता?

  • हार्दिकत्यावर म्हणाला, आजचा दिवस नाही, तर मला वाटतं, हा हंगामच तसा नव्हता. चेन्नईने अधिक चांगला खेळ केला. त्यांनी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीही उत्तम केली. एका क्षणी, आम्ही १८०-१९० धावांपर्यंत पोहोचण्याचा विचार करत होतो. १० षटकांनंतर आम्हाला गती पकडता आली नाही. डावाच्या सुरुवातीला फटकेबाजी करणे सोपे नव्हते. विचारपूर्वक खेळी करणे महत्त्वाचे होते, आणि त्यांनी तेच केले. त्यांची गोलंदाजी अधिक चांगली होती. आम्ही आमच्या गोलंदाजीच्या पर्यायांवर अवलंबून राहिलो, पण ते हुशारीने खेळले आणि सरस ठरले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.