साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 03 मे 2026 ते शनिवार 09 मे 2026
Marathi May 03, 2026 10:25 AM

>> नीलिमा प्रधान

मेष – किचकट कामे करून घ्या

चंद्र, शुक्र प्रतियुती, मंगळ गुरू केंद्रययोग. सप्ताहाच्या सुरूवातीला तणावाचे प्रसंग निर्माण होतील. संयम ठेवा. यश मिळेल. दिग्गज व्यक्तींचा परिचय प्रेरणादायक. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गतिमान वाढेल. शुभ दिवस. ६, ७

वृषभ – योग्य मार्गदर्शन घ्या

चंद्र, शुक्र प्रतियुती, मंगळ गुरू केंद्रयोग. डावपेचांना बळी पडू नका. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. व्यसन, मोह नुकसानकारक. धंद्यात तणाव वाढवू नका. नोकरी टिकवा. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मत व्यक्त करणे धाडसाचे. शुभ दिवस. 3, 4

मिथुन – तटस्थ भूमिका घ्या

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरू प्रतियुती. भावनेच्या आहारी न जाता धैर्याने काम करा. नोकरीत अहंकार नको. धंद्यात लोभ दूर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. प्रसंगी तटस्थ भूमिका घ्या. शुभ दिवस. ६, ७

कर्क – वर्चस्व टिकवता येईल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरू प्रतियुती. मागील अनुभवांनुसार कार्यरचना करा. अपयश टाळा. नोकरीत सहकारी मदत करतील. वर्चस्व टिकवता येईल. व्यवहार स्वच्छ ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. शुभ दिवस. ३, ९

सिंह – अडचणींवर मात करा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. प्रसंगावधान ठेवा. जुने अनुभव लक्षात ठेऊन अडचणींवर मात करा. प्रवासात सावध रहा. वाद वाढवू नका. चौफेर सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबाव आणला जाईल. शुभ दिवस. ६, ७

कन्या – अहंकार दूर ठेवा

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र मंगळ त्रिकोणयोग. व्यवहार सांभाळा. अहंकाराची भाषा नको तरच कामे वेगाने पडतील. नोकरीत सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. अपमान होतील, मात्र खचू नका. धंद्यात थकबाकी मिळवा. शुभ दिवस. 3, 4

तूळ – अनाठायी खर्च टाळा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरू प्रतियुती. अतिगोड बोलण्यापासून सावध रहा. मनातील गुप्त विचार कुठेही व्यक्त करू नका. अनाठायी खर्च टाळा. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोह दूर ठेवा. लोकप्रियता व प्रतिष्ठा राखा. शुभ दिवस. ६, ७

वृश्चिक – कायदा मोडू नका

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र शुक्र प्रतियुती. वाद, अहंकार दूर ठेवत व्यवहार करा. क्षेत्र कोणतेही असो कायदा मोडू नका. नोकरी टिकवा. कठोर शब्द टाळा. धंद्यात मोठा बदल करण्याची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. शुभ दिवस. ६, ७

धनु – व्यवहार जपून करा

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र गुरू प्रतियुती. तणावाचे प्रसंग टाळा म्हणजे ध्येय गाठाल. नोकरीत व्यवहार जपून करा. भावनेच्या आहारी जाऊ नका. वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकारी वर्गाला नाराज करू नका. प्रतिष्ठा राहील. शुभ दिवस. 3, 4

मकर – विचारपूर्वक निर्णय घ्या

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र मंगळ त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरीत शब्द जपून वापरा. धंद्यात वाद नको. गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. आरोपांना उत्तर देण्यापेक्षा काम करा. शुभ दिवस. 3, 4

कुंभ – वरिष्ठांची मर्जी राखाल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरू प्रतियुती. प्रमाणाबाहेर धाडस करू नका. मैत्रीत, नात्यात गैरसमज होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. धंद्यात शिस्त पाळा. अहंकार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे भाष्य गाजेल. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिवस. 3, 6

मीन – नावलौकिक वाढेल

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र शुक्र प्रतियुती. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. दिग्गजांचा परिचय होईल. महत्त्वाची कामे करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. नावलौकिक वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वादाला दूर ठेऊन योजना पूर्ण करा. शुभ दिवस. 3, 4

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.