सातारा : जिल्ह्यातील काही खासगी शाळा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची खरेदी शाळेतूनच करण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या अनुषंगाने खासगी शाळांनी पालकांवर सक्ती केल्यास कडक कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..दरम्यान, असे प्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने नोडल अधिकाऱ्याचीही नियुक्ती केली आहे. नवीन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात गणवेश, पुस्तके, वह्या, बूट-सॉक्स अशा वस्तू खासगी शाळेतूनच खरेदी करण्यास सांगितल्यास पालकांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या धोरणानुसार कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांच्या पालकांनी विशिष्ट ठिकाणाहून साहित्य खरेदीच्या सक्तीचा अधिकार नाही. शाळांनी केवळ आवश्यक साहित्याची यादी देणे अपेक्षित आहे. मात्र, खरेदीचा निर्णय पालकांवर सोडणे बंधनकारक आहे. मात्र, साताऱ्यातील अनेक खासगी शाळाचालक नियमबाह्य गोष्टी करून पालकांवर दबाव आणण्याचे प्रकार करत आहेत.
यासंदर्भात पालकांनीही दबावास न जुमानता पुढे येत शिक्षण विभागाकडे तक्रारी करणे अपेक्षित आहे. जेणेकरून, खासगी शाळांच्या मनमानीला चाप बसेल. दरम्यान, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व शाळांनी या सूचनांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
टक्केवारीसाठी खटाटोपकाही खासगी संस्थाचालक शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश, पुस्तके, वह्या, बूट- सॉक्स खरेदी करतात. यामागे प्रत्येक विद्यार्थ्यांमागे टक्केवारी मिळविण्याचा हेतू असतो. त्यासाठी आपल्याच शाळेतून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्याचे प्रकार होतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे काही रुपये टक्केवारी घेतल्यास लाखो रुपये मिळविले जातात, तर पालकही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे.
Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!जिल्ह्यातील कोणत्याही खासगी शाळेला गणवेश, पुस्तके, वह्या, बूट-सॉक्स किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्यास सक्ती करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षण विभाग संबंधितांवर कडक कारवाई करणार आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पालकांनी कोणताही दबाव न घेता पुढे येऊन तक्रार नोंदवावी.
- अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग