Pune Metro: माण-हिंजवडी-बालेवाडी मेट्रो ३१ मेपर्यंत सुरू होणार?, पहिला टप्पा अंतिम टप्प्यात, मेट्रो मार्ग-३ च्या कामांना गती..
esakal May 03, 2026 12:45 PM

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्ग-३ ची कामे वेगाने सुरू आहेत. माण-हिंजवडी ते बालेवाडी हा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..

हिंजवडी आयटी हबमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मे अखेरपर्यंत मार्गावरून मेट्रो प्रवासी सेवा करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी १५ मे रोजी ‘टाटा’ आणि ‘पीएमआरडीए’ची उच्चस्तरीय आढावा बैठक होणार आहे. त्यात प्रत्यक्ष कामाचा आढावा घेऊन मार्ग कार्यान्वित करण्याबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मेट्रो सुरू झाल्यास...

३१ मेपर्यंत मेट्रो सेवा कार्यान्वित झाल्यास बालेवाडी स्टेडियमपर्यंत प्रवास करणे सुकर

हजारो आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल

हिंजवडी परिसरातील वाहनांचा ताण लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होईल

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक! प्रकल्पाची सद्यस्थिती

माण- हिंजवडी- बालेवाडी दरम्यान १२ स्थानकांचे स्थापत्य काम ९५ टक्क्यांहून अधिक पूर्ण

किरकोळ दुरुस्ती आणि शेवटच्या टप्प्यातील सजावटीची कामे वेगाने सुरू

तांत्रिक चाचण्या आणि प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधांची पडताळणी युद्धपातळीवर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.