Emergency Alert System: संकटकाळात नागरिकांना सावध करणार 'संदेश'; आपत्कालिन यंत्रणेचा प्रारंभ, चाचणी संदेश प्रसारित, आपत्कालीन काळात उपयुक्त!
esakal May 03, 2026 02:45 PM

नवी दिल्ली: आपत्कालिन परिस्थितीमध्ये तातडीने संदेश देण्यासाठीची आपत्कालीन संदेश यंत्रणा केंद्र सरकारने कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमार्फत आज मोबाईलवर भोंग्यासारख्या आवाजासह चाचणी संदेश प्रसारित करण्यात आले. अचानक आलेल्या या संदेशांमुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमावस्था निर्माण झाली असली तरी हा केवळ चाचणी संदेश असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..

मोबाईलवर आलेल्या या संदेशात, ‘भारताने नागरिकांसाठी तातडीच्या आपत्ती सूचना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे ‘सेल ब्रॉडकास्ट’ सेवा सुरू केली आहे. दक्ष नागरिक, सुरक्षित देश. हा केवळ चाचणी संदेश असून कोणतीही कृती करण्याची गरज नाही,’ असे नमूद करण्यात आले होते.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत आज मोबाईल-आधारित आपत्कालीन संदेश यंत्रणेचा प्रारंभ करण्यात आला. ही यंत्रणा दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित केली आहे.

भारताच्या नव्या देशव्यापी मोबाइल-आधारित आपत्ती संदेश प्रणालीचा भाग म्हणून पाठवलेला हा चाचणी संदेश आहे. ही प्रणाली पुढे प्रत्यक्षातील भौगोलिकदृष्ट्या महत्त्वांच्या घटनांच्यावेळी आणि अनेक भाषांमध्ये दक्षतेचा संदेश पाठवण्यासाठी वापरली जाणार आहे.

- ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय दूरसंचारमंत्री

चाचणी व यंत्रणेची उपयुक्तता

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दल यांच्या वार्षिक परिषदेदरम्यान या संदेश प्रणालीची प्रात्यक्षिक चाचणी घेतली

अडचणीत अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भोंग्यासह दक्षतेचे संदेश मिळाले

आपत्तीच्या काळात वेळेवर माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने पूर, भूकंप, चक्रीवादळ किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सावध करणे

जीवितहानी टाळण्यासाठी

तंत्रज्ञानाची साहाय्य

सरकारकडून अशा चाचण्या वेळोवेळी घेतल्या जातील

यंत्रणेची कार्यक्षमता तपासून ती अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार

नागरिकांनी अशा चाचणी संदेशांबाबत घाबरून न जाता त्यामागील उद्देश समजून घेणे आवश्यक असल्याचे सरकारचे आवाहन

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक! अशी आहे ही यंत्रणा

आपत्कालीन स्थितीत संदेश पोहोचविण्यासाठी ‘सचेत’ ही एकात्मिक संदेश प्रणालीचा विकास

देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंमलबजावणी

सी-डॉट (दूरसंचार विकास केंद्र) यांनी विकसित केलेल्या व्यासपीठाद्वारे सएमएसच्या माध्यमातून भौगोलिकदृष्ट्या संदेशांची पाठवणी

प्रणालीची कार्यपद्धती आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या ‘कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल’वर आधारीत

आतापर्यंत देशभरात १९ हून अधिक भारतीय भाषांमध्ये १३४ अब्जांपेक्षा जास्त दक्षता संदेश प्रसारित

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.