अहमदाबाद : पंजाब किंग्सची विजयी वाटचाल रोखली गेली असली तरी त्यांचा दरारा कमी झालेला नाही. या आयपीएलमध्येपुन्हा विजयीपथावर येण्यासाठी पंजाबचा सामना आज सलग तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या गुजरातविरुद्ध होत आहे.
श्रेयस अय्यरच्यानेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब संघाचा सात सामन्यांनंतर पहिला पराभव झाला. या आठवड्याच्या सुरुवातीस झालेल्या सामन्यात राजस्थानने त्यांच्यावर मात केली होती. हा एकमेव पराभव झाला असला तरी पंजाब संघ १३ गुणांसह गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहेत. त्यानंतर बंगळूर, हैदराबाद, राजस्थान आणि गुजरात अशी पहिली पाच संघांची क्रमवारी आहे. उद्या पाचव्या स्थानावर असलेला गुजरातचा संघ पंजाबला आव्हान देत आहे.
IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबलयंदाची आयपीएल सुरू झाल्यापासून दरारा निर्माण करणाऱ्या पंजाबची गोलंदाजी मात्र फलंदाजीच्या तुलनेत तेवढी सक्षम नाही. दिल्लीविरुद्ध गेल्या शनिवारी झालेल्या सामन्यात २६४ धावा त्यांनी दिल्या होत्या; मात्र फलंदाजीच्या जोरावर त्या पार करून विजयी मालिका कायम ठेवली होती. त्यानंतर राजस्थानविरुद्ध केलेल्या २२२ धावांचे संरक्षण त्यांना करता आले नव्हते. त्यांच्या गोलंदाजांविरुद्ध प्रतिस्पर्धी सहजतेने धावा फटकावत आहेत.
ही आयपीएल आता अधिक स्पर्धात्मक अशा दुसऱ्या टप्प्यात असताना पंजाब संघाला पुढे मोठी मजल मारायची असेल तर गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात राजस्थानविरुद्ध पराभव झाल्यानंतर उद्या होणाऱ्या गुजरातविरुद्धच्या सामन्यातून करावी लागणार आहे. एकीकडे गोलंदाजांचे अपयश असताना झेलही सोडले जात आहेत.
पंजाबला फलंदाजीची चिंता नाही. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेत जास्तीत जास्त आणि त्याही वेगात धावा करीत आहेत. त्यानंतर कूपर कॉनोली, कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजी अधिक मजबूत करीत आहेत.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरातचा संघ उद्या सलग दोन विजयांमुळे वाढवलेल्या आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहेत. यंदाच्या मोसमातील त्यांना सुरुवातीला चढ-उताराचा सामना करावा लागला होता, आता मात्र त्यांना चांगली लय सापडली आहे. अगोदर चेन्नई आणि दोन दिवसांपूर्वी बंगळूर संघाला पराभूत करून गुजरातने एकूण १० गुणांची कमाई केली आहे.
गुजरातचे हे यश कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जॉस बटलर यांच्या फलंदाजीमुळे मिळत आहे; मात्र त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान आणि राहुल तेवटिया हे फलंदाज तेवढे सक्षम नाहीत. अष्टपैलू जेसन होल्डरमुळे गुजरात संघ समतोल झाला आहे. बंगळूरवर मिळवलेल्या विजयात त्याने चार षटकांत २९ धावांत दोन विकेट मिळवल्या आणि चार झेलही टिपले.
RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती गुजरातची गोलंदाजी जमेची बाजूगोलंदाजीतील सुधारणा ही गुजरातसाठी जमेची बाजू ठरत आहे. बंगळूर संघाने धडाकेबाज सुरुवात केली होती; परंतु गुजरात गोलंदाजांनी त्यांची सहा बाद ९६ अशी अवस्था केली होती. राशीद खानला सापडलेला सूर त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
संभावित प्लेइंग इलेव्हनगुजरात टायटन्स (GT) संभाव्य प्लेइंग 11 (Probable XI):
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार.
पंजाब किंग्स (PBKS) संभाव्य प्लेइंग 11 (Probable XI):
प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कॉनॉली, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, मार्को जान्सन, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.