भारतात वेगाने विस्तार करणाऱ्या रिटेल साखळ्यांमध्ये DMart हे नाव आज अग्रस्थानी आहे. स्वस्त दरात दर्जेदार वस्तू देण्यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय ग्राहकांचा या ब्रँडवर मोठा विश्वास आहे. पण या यशामागे हजारो कर्मचाऱ्यांची मेहनत दडलेली आहे.
आज देशभरात 300 हून अधिक स्टोअर्ससह ही कंपनी वेगाने वाढत आहे. किफायतशीर दर, ग्राहक सेवा आणि विश्वासार्हता ही DMart ची मुख्य ताकद ठरली आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो DMart मध्ये काम करणाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो?
DMart मध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अनुभवावर अवलंबून असते.
1. सेल्स असोसिएट / कॅशियर
मासिक पगार साधारण 12,000 ते 14,000 दरम्यान असतो. ग्राहकांना मदत करणे, बिलिंग आणि माल व्यवस्थापन ही कामे करावी लागतात.
2. स्टोअर स्टाफ / रिटेल असिस्टंट
या पदासाठी 10,800 ते 14,200 इतका मासिक पगार दिला जातो. शेल्फ व्यवस्थापन, माल लावणे आणि ग्राहक सेवा ही मुख्य कामे असतात.
3. सुपरवायझर / सेक्शन हेड
या पदावर काम करणाऱ्यांना 18,000 ते 25,000 दरम्यान पगार मिळतो. विभागाचे कामकाज पाहणे आणि टीम मॅनेजमेंट ही जबाबदारी असते.
4. Assistant Store Manager / Deputy Manager
या पदासाठी मासिक पगार 30,000 ते 52,000 पर्यंत असतो. स्टोअर मॅनेजरला सहाय्य करणे आणि कर्मचारी व्यवस्थापन ही कामे करावी लागतात.
5. Store Manager
स्टोअर मॅनेजरचा पगार 40,000 ते 90,000 दरम्यान असतो. संपूर्ण स्टोअरची जबाबदारी, विक्री आणि कर्मचारी व्यवस्थापन त्यांच्याकडे असते.
DMart आपल्या कर्मचाऱ्यांना EPF, ग्रॅच्युटी, वैद्यकीय विमा, परफॉर्मन्स बोनस आणि स्टाफसाठी शॉपिंग सवलतीसारखे फायदे देते. DMart मध्ये सुरुवातीचा पगार तुलनेने कमी वाटू शकतो, पण अनुभव आणि कामगिरीनुसार वाढीच्या चांगल्या संधी मिळतात. मेहनत, शिस्त आणि सातत्य असेल तर या कंपनीत स्थिर करिअर घडवता येऊ शकते.
आज DMart हा फक्त एक रिटेल ब्रँड नसून लाखो ग्राहकांचा विश्वास आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा परिणाम आहे. किफायतशीर दरात सेवा देणाऱ्या या कंपनीत काम करणारे कर्मचारीच तिचे खरे आधारस्तंभ ठरतात.