आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार
या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची शिफारस
तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांची माहिती
नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, आयोगाचे आवाहन
सिडकोच्या घरांची सोडत लांबणीवरनवी मुंबईमध्ये सिडकोने १६,८७६ घरांची लॉटरी जाहीर केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोच्या २६ हजार घरांच्या लॉटरीमधील अल्प उत्पन्न गटातील (LIG) घरांच्या वाटपाला स्थगिती दिली आहे.
यामुळे १६,८७६ घरांची ही सोडत लांबणीवर पडली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अर्जदारांनी सिडकोचे फॉर्म भरण्यासाठी ७५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम सिडकोकडे जमा केली आहे. मात्र, अद्याप ही लॉटरी काढण्यात न आल्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे सिडकोकडेच अडकून पडले आहेत. सोडत लांबणीवर गेल्यामुळे सर्वसामान्य अर्जदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
Maharashtra News Live Update: पुण्यातील नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुरडीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कारनसरापूर प्रकरणातील पीडित चिमुरडीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले अंत्यविधी
वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, कुटुंबीयांची मागणी