-ज्ञानेश्वर बोरूडे.
लोहगाव : पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथील मावस भावाच्या शुभविवाह कार्यासाठी हळदी समारंभा पासुन आलेला एकुलता एक तरूणांचा शेत तळ्यात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यूची घटना शनिवार (ता.२) दुपारून घडल्याने लग्ना घरातील कुटुंब आप्तेष्ट आनंदा ऐवजी शोक सागारात बुडाले ऒम विश्वभंर खरात (वय २२) रा.सोलनापूर (ता.पैठण) असे मयत तरूणाचे नाव आहे.
Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..या घटने विषयी मिळालेली माहिती अशी की.७४ जळगाव येथील वर तेजस शिवाजी सु्क्रे यांच्या शुभविवाहा निमित्त हळदी समारंभा पासुनच मावसभाऊ ओम खरात व इतर नातेवाईक मुले ७४ जळगाव येथे आलेले होते. शनिवार (ता.२) दुपारून तिघेजण रखरखत्या ऊन्हात जळगाव शिवारातील दिलीप गटकळ या नातेवाईकाच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता ओम खरात पाण्यात बुडला असता इतर दोघांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले.
या घटनेची माहिती बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांना मिळताच त्यांनी संभाजीनगर अग्निशमन दलाचे रेस्क्यू टिमचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांना हि माहिती दिली असता तात्काळ रेस्क्यू टिमचे उप अधिकारी विनायक कदम, वैभव बाकडे,मतीन शेख, सचिन फुले, विनोद बमणे, संदिप चव्हाण, योगेश दुधे, आदीं जवानांनी घटना स्थळी धाव घेऊन शोध मोहीम राबवून तरूणांचा मृतदेह बाहेर काढून बिडकीन पोलिस स्टेशनचे हवालदार योगेश नाडे, अमोल मगर यांच्या ताब्यात दिला.
Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!पोलीसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. या घटनेची बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार योगेश नाडे, अमोल मगर, करत आहे. दरम्यान लग्न घटीकेला चौवीस तास रवीवार ( ता.३) बाकी असताना वराच्या मावस भावांचा मृत्यूंची घटना घडल्याने लग्न घरी आनंदावर विरजण पडले आहे.